परभणी : शाळेची भिंत पडून सात विद्यार्थिनी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:21 AM2018-08-28T00:21:04+5:302018-08-28T00:21:44+5:30

शहरातील उस्मानपुरा भागातील हजरत अबूबकर सिद्दीकी प्राथमिक ऊर्दू शाळेची भिंत कोसळून चौथी वर्गातील सात विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना २७ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

Parbhani: Seven female students injured after school wall collapsed | परभणी : शाळेची भिंत पडून सात विद्यार्थिनी जखमी

परभणी : शाळेची भिंत पडून सात विद्यार्थिनी जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): शहरातील उस्मानपुरा भागातील हजरत अबूबकर सिद्दीकी प्राथमिक ऊर्दू शाळेची भिंत कोसळून चौथी वर्गातील सात विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना २७ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
उस्मानपुरा भागात जनसेवा बहूउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित हजरत अबूबकर सिद्दीकी प्राथमिक व माध्यमिक ऊर्दू शाळा आहे. पहिली ते सातवी वर्गापर्यंत या शाळेत जवळपास ३२४ विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाली. दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास चौथी व पाचवीच्या वर्ग खोलीची भिंत बाहेरील बाजूस कोसळली. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली. ही भिंत कोसळत असताना विटांचा मार लागून चौथी वर्गात शिक्षण घेणारी स. अंशीरा स. मोहसीन, खिजरा तालेब चाऊस, रुमैय्या नसीब खा, हुमेरा नसीबखाँ, फातेमाबी शेख अझहर, सुमैय्या फैजुल्ला खाँ, सानिया रहीम शेख या सात विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, इतर काही विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले. शाळेची भिंत कोसळण्याची माहिती मिळताच अनेक पालकांनी शाळेकडे धाव घेतली. अनेकांनी पडलेल्याभिंतीचा ढिगारा उचलून त्याखाली विद्यार्थी अथवा वाटसरु दबलेले तर नाही ना, याची खात्री केली. मागील आठवड्यात शहरात दोन-तीन दिवस जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळेच भिंत कमकुवत होऊन पडली. याच वर्गाच्या समोरील बाजूची भिंतही पडण्याच्या मार्गावर असून, ती भिंत पाडून नवीन वर्ग खोल्या बांधाव्यात, अशी मागणी होत आहे.

Web Title: Parbhani: Seven female students injured after school wall collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.