परभणी : नोंदणी झालेली सर्व तूर हमीभावाने खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:06 AM2018-04-12T00:06:03+5:302018-04-12T00:06:03+5:30

परभणी येथील हमीभाव केंद्रावर नोंदणी झालेली सर्व तूर खरेदी करण्याच्या सूचना आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना केल्या आहेत़

Parbhani: Shop for all the merchandise registered with certainty | परभणी : नोंदणी झालेली सर्व तूर हमीभावाने खरेदी करा

परभणी : नोंदणी झालेली सर्व तूर हमीभावाने खरेदी करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी येथील हमीभाव केंद्रावर नोंदणी झालेली सर्व तूर खरेदी करण्याच्या सूचना आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना केल्या आहेत़
परभणी येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु, या केंद्रावर तुरीची खरेदी होणे बाकी आहे़ या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी अधिकाºयांची बैठक घेतली़ परभणी केंद्रावर ४ हजार ६०० शेतकºयांनी नोंदणी केली असून, केवळ २२४ शेतकºयांचीच तूर खरेदी झाल्याचे अधिकाºयांनी कबूल केले़ तूर खरेदीसाठी १८ एप्रिल ही अंतिम तारीख असून, उर्वरित ७ दिवसांत एवढी तूर कशी खरेदी करणार, असा सवाल आ़ पाटील यांनी केल्यानंतर अधिकाºयांनी जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला़ त्यावर येत्या १५ दिवसांत नोंदणी झालेली सर्व तूर खरेदी करा, त्यासाठी केंद्रावरील काटे वाढविण्याच्या सूचनाही आ. पाटील यांनी केल्या़ या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा मार्केटींग अधिकारी कापुरे, बाजार समितीचे सचिव विलास मस्के, बाजार समितीचे संचालक गंगाप्रसाद आणेराव, सोपानराव आवचार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, नंदकुमार अवचार, गजानन देशमुख, दिनेश बोबडे, संदीप झाडे, फैजुल्ला पठाण, सरपंच गोपीनाथ झाडे, अनिल डहाळे, महेश इंगळे आदींची उपस्थिती होती़

Web Title: Parbhani: Shop for all the merchandise registered with certainty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.