परभणी: २०० क्विंटल हळदीची पहिल्याच दिवशी खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 11:07 PM2019-04-06T23:07:20+5:302019-04-06T23:07:55+5:30
जिंतूर तालुक्यातील बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारपासून हळदीची खरेदी सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी कृउबा मार्केट यार्डात २०० क्विंटल हळदीची खरेदी करण्यात आली आहे. या हळदीला ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारपासून हळदीची खरेदी सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी कृउबा मार्केट यार्डात २०० क्विंटल हळदीची खरेदी करण्यात आली आहे. या हळदीला ६ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ६ एप्रिल रोजी बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी एम.यु.यादव यांच्या हस्ते हळद खरेदी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एस.एम.कासटवार, संतोष चौधरी, यमाजी इप्पर, डी.एल.गायकवाड यांची उपस्थिती होती. मार्केट यार्डात हळद विक्रीस आणलेल्या करवली येथील रावसाहेब घाटुळ, बोर्डी येथील कुंडलिकराव कदम, बोरी येथील शेख अतिक शेख रफीक या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ६ एप्रिलपासून बोरी बाजार समितीत हळद खरेदी करण्यास सुरुवात झाल्याने परिसरातील २० ते २५ गावातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी झालेल्या हळद खरेदी- विक्रीमध्ये व्यापारी त्र्यंबकराव बोर्डीकर, दीपक अग्रवाल, राजगोपाल झंवर, आनंद मुरक्या, मुरली झंवर, सुनील झंवर, राजू जैन, प्रसाद गोरे, भगवान झंवर, नंदकुमार पतंगे, पंकज चौधरी, प्रकाश झंवर, लिंबाजी टाक, अनंत देशमुख, प्रकाश देशमुख, हनुमान अग्रवाल, अरुण कदम, प्रवीण बिर्ला, रवि झंवर, एकनाथ गोरे या व्यापाºयांसह शेतकरी दगडोबा वजीर, बाजीराव शेवाळे, वामन शिंपले, रामकृष्ण शिंपले, भागोजी शिंपले यांनी सहभाग घेतला होता.
यशस्वीतेसाठी बी.एन.रोडे, आर.एम.टाक, आर.एम.चक्कर, गोविंद राऊत आदींनी प्रयत्न केले.