परभणी : मूकबधीर महिलेवर अत्याचार; दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:55 PM2020-03-17T22:55:59+5:302020-03-17T22:56:26+5:30
एका मूकबधीर महिलेवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एका मूकबधीर महिलेवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- पीडित महिलेच्या आईने पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. पीडित ३० वर्षीय महिला मूकबधीर असून, सोमवारी सायंकाळी ती सरपण जमा करीत असताना आरोपी प्रल्हाद अण्णासाहेब गव्हाणे आणि दिलीप पंढरी करवडे यांनी या महिलेला बळजबरीने शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या तक्रारीवरुन दैठणा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध बलात्कारासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड तपास करीत आहेत. दरम्यान, गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहायक पोलीस निरीक्षक मुंडे, कर्मचारी कांबळे नागरे, लटपटे यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली आहे.