परभणी : रबीतही संथ गतीने कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:45 AM2018-11-27T00:45:30+5:302018-11-27T00:45:58+5:30
यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना पीक कर्ज वाटपालाही घरघर लागली आहे. खरीप हंगामामधील कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसताना रबी हंगामातही आतापर्यंत केवळ ६.५३ टक्के कर्ज वाटप झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गोची होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना पीक कर्ज वाटपालाही घरघर लागली आहे. खरीप हंगामामधील कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसताना रबी हंगामातही आतापर्यंत केवळ ६.५३ टक्के कर्ज वाटप झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गोची होत आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी खरीप आणि रबी पिकांच्या पेरण्यांसाठी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले जाते. हे उद्दिष्ट पूर्ण करणे बँकांसाठी बंधनकारक आहे. दरवर्षी बँकांकडून उद्दिष्टांची पूर्तीही होते. मात्र यावर्षी खरिपापाठोपाठ रबी हंगामातील उद्दिष्टालाही घरघर लागली आहे. यावर्षी खरीप हंगामामध्ये जिल्ह्यासाठी १४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांचे उद्दिष्ट बँकांना दिले होते. खरीप हंगाम संपून गेला तरी हे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. आता बँकांना रबी हंगामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. परभणी जिल्ह्यात रबी हंगामासाठी ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये ग्रामीण बँकेला ३१ कोटी ८२ लाख १७ हजार रुपये, व्यापारी बँकांना २०७ कोटी ११ लाख ३१ हजार रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७४ कोटी ५३ लाख ८६ हजार रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहे.
आॅक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात रबीचा हंगाम सुरु होतो. या हंगामात शेतकºयांना पेरणी करणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने पीक कर्जाचे वाटप केले जाते. रबी हंगामासाठी दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत २६ नोव्हेंबरपर्यंत २० कोेटी ४७ लाख ४३ हजार रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. या कर्ज वाटपाची टक्केवारी ६.५३ टक्के एवढी आहे. ग्रामीण बँकेने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत १६ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
व्यापारी बँकांनी केवळ ३ कोटी ७७ लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ५० लाख २३ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
जिल्ह्यातील २ हजार ६३१ शेतकºयांनाच या कर्जाचा लाभ झाला आहे. रबीचा हंगामही ओसरत असून बँकांकडून रबी हंगामातील कर्ज वाटपाचे उद्दिष्टही पूर्ण न होण्याची शक्यताच अधिक आहे.
खरीपात ३० टक्के वाटप
४यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही बँकांकडून पीक कर्ज वाटपाला धिमा प्रतिसाद मिळाला. या हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. बँकांनी ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३० टक्के कर्ज वाटप झाले असून खरीपाचा हंगाम संपल्याने आता बँकांनी रब्बी हंगामासाठी कर्ज वाटपाला सुरुवात केली आहे; परंतु, या हंगामातही कर्ज वाटपाची गती कमी असल्याचे दिसत आहे.
ग्रामीण बँकेचे सर्वाधिक कर्ज वाटप
४खरीप हंगामाबरोबरच रब्बीच्या हंगामातही ग्रामीण बँकेने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत सर्वाधिक कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बँकेला ३१ कोटी ८२ लाख रुपयांचे रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते. बँकेने २ हजार १३५ शेतकºयांना १६ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्याची टक्केवारी ५०.९१ टक्के एवढी आहे. व्यापारी बँकांनी केवळ १.८२ टक्के उद्दिष्ट गाठले असून जिल्हा मध्यवर्ती बँकेने ०.६७ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
पेरण्या रखडल्याचा परिणाम
४परतीच्या पावसावर जिल्ह्यात रबी हंगामाच्या पेरण्या केल्या जातात. मात्र यावर्षी या हंगामात पेरण्याच झाल्या नाहीत. केवळ १३ टक्के पेरण्या झाल्या असून उर्वरित शेतकºयांनी रबीच्या पीक कर्जाकडेही पाठ फिरवली आहे. पेरण्याच नसल्याने पीक कर्ज वाटपही होत नसल्याची स्थिती जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रबी हंगामच होणार नसल्याने शेतकºयांना उत्पन्नावर पाणी फेरावे लागणार आहे.