परभणी : घनकचरा व्यवस्थापनासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:00 AM2018-05-21T00:00:06+5:302018-05-21T00:00:06+5:30
परभणी शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून या प्रकल्पासाठी नुकताच १८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधीही महापालिकेला प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
१८ कोटी ८३ लाखांचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून या प्रकल्पासाठी नुकताच १८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधीही महापालिकेला प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
औरंगाबाद येथील कचऱ्याची समस्या राज्यभर गाजल्यानंतर महानगरपालिकांच्या शहरांमध्ये कचºयाचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने राज्यशासनाने महानगरपालिकांकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी आराखडा मागविला होता. दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथे झालेल्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, राज्य शासनाने या आराखड्यानुसार १८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी महापालिकेला प्रदान केला आहे. या निधीत १४ व्या वित्त आयोगातून परभणी महानगरपालिकेने ७ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर उर्वरित राज्य शासनाचा ४० टक्के आणि केंद्र शासनाचा ६० टक्के निधी मंजूर करण्यात आला आहे.
नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. परभणी शहरासाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच या निधीमधून कामे केली जाणार आहेत. एकूण २९ बाबींवर ही कामे होणार आहेत. त्यात बायोमायनिंग प्रकल्प उभारणे, ३ कॉम्पॅक्टर, २ टिप्पर खरेदी करणे तसेच लोकांमध्ये जनजागृती, कर्मचाºयांचे प्रशिक्षण आदी बाबींवर या निधीमधून खर्च होणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
आचारसंहितेनंतर होणार कामे
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी देत निधीही उपलब्ध करुन दिला आहे. सध्या परभणी जिल्ह्यात विधानपरिषदेची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे ही आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाची प्रक्रिया सुरु होणार आहे. या प्रकल्पाच्या कामकाजासंदर्भात मनपाच्या सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या अंतर्गत करण्यात येणाºया कामांसाठी निविदा मागविल्या जाणार असून निविदा प्रक्रिया राबवून कामे केली जाणार आहेत.
अधिकाºयांवर दिली प्रकल्पाची जबाबदारी
महापालिकेचे आयुक्त तथा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी मनपातील अधिकाºयांकडे विविध जबाबदाºयाही देण्यात आल्या आहेत. त्यात यांत्रिकी विभागप्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्याकडे तांत्रिक स्वरुपाची जबाबदारी आहे. कनिष्ठ अभियंता शेख आर्शद यांच्याकडे बांधकामाच्या अनुषंगाने तर प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्यावर स्वच्छतेच्या संदर्भात जबाबदारी देण्यात आली आहे.
कचºयाच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न
परभणी शहरात सध्या जमा होणारा कचरा धाररोड येथील डपिंग ग्राऊंडवर साठविला जातो. स्वच्छता अभियानांतर्गत या कचºयाचे नैसर्गिकरित्या प्रक्रिया करण्याचा प्रकल्पही शहरात कार्यान्वित आहे. धाररोड परिसरातील डपिंग ग्राऊंड येथे जमा होणाºया कचºयापासून रासायनिक व गांडुळ खताची निर्मितीही केली जात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी साठलेला जुना कचरा रासायनिक पदार्थांच्या वापराने नष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात सध्या कचºयाचा प्रश्न नसला तरी आगामी ५० वर्षात कचºयाची समस्या निर्माण होऊ नये, यादृष्टीने राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प शहरासाठी मंजूर केला आहे.