परभणी : शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळाला ३३४१ रुपयांचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:52 AM2018-11-19T00:52:33+5:302018-11-19T00:53:02+5:30
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १५ आॅक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली आहे़ १६ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला जाहीर लिलावामध्ये ३ हजार ३४१ रुपयांचा भाव मिळाला़ विशेष म्हणजे, राज्य शासनाने ३ हजार ३९९ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे़ त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १५ आॅक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली आहे़ १६ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला जाहीर लिलावामध्ये ३ हजार ३४१ रुपयांचा भाव मिळाला़ विशेष म्हणजे, राज्य शासनाने ३ हजार ३९९ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे़ त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़
गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरातील शेतकºयांना नैसर्गीक संकटांचा सामना करावा लागत आहे़ खरीप व रबी हंगामात पेरणी केलेल्या पिकातून शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहेत़ दरवर्षी खरीप व रबी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकºयांना पीक कर्ज मिळविण्यासाठी बँकांची दारे ठोठवावी लागत आहेत़ उसणवारीवर पैसे उपलब्ध करून खरीप व रबी हंगामातील पेरणी केली जाते़ त्यातून उत्पादित झालेला शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर व्यापाºयांकडून शेतकºयांच्या शेतमालाला अपेक्षित भाव दिला जात नाही़ त्यामुळे शेतकºयांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडते, हा आजपर्यंतचा अनुभव आहे़
यावर्षी जून व जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला़ या पावसाने आॅगस्ट महिन्यात सोयाबीन, कापूस ही खरीप हंगामातील पिके चांगली बहरली़ परंतु, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर या तीन महिन्यांत पाऊसच झाला नाही़ त्यामुळे सोयाबीन व कापूस पिके जागेवरच करपून गेली़ ज्या शेतकºयांकडे उपलब्ध पाणी साठा आहे़ त्या शेतकºयांनी सोयाबीन जोपासले़ बोरी व परिसरातील शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी बोरी बाजार समितीच्या मार्केट यार्डात आणावा, यासाठी बाजार समितीने १५ आॅक्टोबरपासून जाहीर लिलावाद्वारे सोयाबीन खरेदी सुरू केली़
राज्य व केंद्र शासनाने जाहीर केलेला ३ हजार ३९९ रुपयांचा हमीभाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती़ परंतु, व्यापाºयांकडून हमीभावाला फाटा देत अडीच ते तीन हजार रुपयांप्रमाणे शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी केली़; परंतु, १६ नोव्हेंबर रोजी बोरी येथील बाजार समितीमध्ये शेतकºयांच्या सोयाबीनला ३ हजार ३४१ रुपयांचा भाव मिळाला़ त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़
३० हजार क्विंटल सोयाबीन खरेदी
जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून बोरी बाजार समितीकडे पाहिले जाते़ १५ आॅक्टोबरपासून या बाजार समितीत जाहीर लिलावाद्वारे सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली़ दिवाळी सणाला शेतकºयांना पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी जास्तीत जास्त व्यापाºयांकडून शेतकºयांचा शेतमाल खरेदीस सुरुवात झाली़ १६ नोव्हेंबरपर्यंत या बाजार समितीत बोरी व परिसरातील शेतकºयांकडून ३० हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे, जिंतूर येथे राज्य शासनाने शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत़ त्यासाठीची प्रक्रिया सुरू असली तरी बोरी बाजार समितीत हमीभावाबरोबर भाव मिळत असल्याने शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणीकडे पाठ फिरवून खाजगी बाजारपेठेत आपला शेतमाल विक्री करण्यासाठी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे़
बाजार समितीतील व्यापाºयांकडून शेतकºयांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न बाजार समितीकडून करण्यात येत आहे़ सोयाबीन बरोबरच कापसालाही सर्वोच्च भाव देण्याचा विचार व्यापारी व बाजार समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे़ त्यामुळे शेतकºयांनी आपला शेतमाल बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीस आणावा़
-चंद्रकांत चौधरी,
मुख्य प्रशासक बाजार समिती, बोरी