परभणी : रेशनकार्ड प्रकरणांसाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:20 AM2019-07-24T00:20:25+5:302019-07-24T00:21:15+5:30

रेशन कार्डांचे नूतनीकरण, विभक्तीकरण, बदलून घेणे आदी प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, ३१ आॅगस्टपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़

Parbhani: Special campaign for ration card cases | परभणी : रेशनकार्ड प्रकरणांसाठी विशेष मोहीम

परभणी : रेशनकार्ड प्रकरणांसाठी विशेष मोहीम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रेशन कार्डांचे नूतनीकरण, विभक्तीकरण, बदलून घेणे आदी प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, ३१ आॅगस्टपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शिधापत्रिकांचे नूतनीकरण, विभक्तीकरण आणि गरजूंना नवीन शिधापत्रिका बदलून देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती़ त्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याला या संदर्भात आढावा घेऊन या संदर्भातील माहिती ५ तारखेस शासनाला सादर करण्याचे आदेश २५ मे २०१८ रोजी पुरवठा विभागाच्या उपायुक्तांना देण्यात आले होते; परंतु, कोणत्याही जिल्ह्याने या संदर्भातील माहिती सादर केली नाही़ त्यामुळे या बाबतचा आढावा घेता आला नाही़ १७ फेबु्रवारी २०१९ रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने या संदर्भात मुख्यमंत्र्यासमवेत झालेल्या बैठकीत पुन्हा हा मुद्दा उपस्थितीत करण्यात आला़ त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ च्या तरतुदीनुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिनस्त कार्यालयामार्फत पात्र नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोेकसेवा १४ आॅक्टोबर २०१५ च्या अधिसूचनेन्वये सूचित करण्यात आले आहे़ त्यामध्ये नवीन शिधापत्रिका देणे, दुय्यम शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेतील नाव कमी करणे इ. चा समावेश आहे़ यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे़ त्या अनुषंगाने पुरवठा विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले असून, या मोहिमेत शिधापत्रिका बदलून देणे, विभक्तीकरण करणे, नवीन शिधापत्रिका देणे आदी मोहीम राबवून ३१ आॅगस्टपर्यंत या बाबतचा अहवाल शासनास सादर करावा, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़

Web Title: Parbhani: Special campaign for ration card cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.