परभणी : रस्त्यांच्या कामांना गती मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:29 AM2019-06-29T00:29:10+5:302019-06-29T00:29:52+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या आणि मुख्य रस्त्यापासून गावांना जोडणाºया जोड रस्त्यांच्या कामांना गती मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Parbhani: The speed of the road works | परभणी : रस्त्यांच्या कामांना गती मिळेना

परभणी : रस्त्यांच्या कामांना गती मिळेना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या आणि मुख्य रस्त्यापासून गावांना जोडणाºया जोड रस्त्यांच्या कामांना गती मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाºया देऊळगाव-डासाळा, रवळगाव-आहेर बोरगाव आदी रस्त्यांसाठी गतवर्षी निधी मंजूर करण्यात आला होता. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करून ६ महिन्याहून अधिक कालावधीत लोटला. मात्र संबंधित कंत्राटदार ही कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीमान करत नाही. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था कोलमडणार असल्याचे चित्र दिसून येते आहे.
देऊळगाव ते डासाळा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावरील देऊळगाव, डासाळा, लाडनांद्रा या गावांची वाहतूक धोकादायक बनली होती. त्यानंतर या गावातील ग्रामस्थांनी आंदोलन करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. देऊळगाव ते डासाळा या ३ कि.मी. रस्त्यासाठी २ कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. निविदा प्रक्रियेत अनेक दिवस लोटले. त्यानंतर गतीने काम होईल, अशी अपेक्षा होती. मात्र काही अंतराचे काम करून अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे पाऊस पडताच या रस्त्यावर वाहतूक करणे अवघड होणार आहे.
त्याचबरोबर सेलू-रवळगाव-आहेर बोरगाव- शिंदे टाकळी या दरम्यान खराब झालेला १० कि.मी. रस्ता बनविण्यासाठी जवळपास ३ कोटींचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र ६ महिने लोटले तरी केवळ ६ कि.मी. रस्त्याचेच काम पूर्ण झाले आहे. सीलकोट, साईडपट्याचे काम अद्यापही केले नाही. तालुक्यातील रस्त्यांची कामे करण्यासाठी राजकीय पुढारी मर्जीतील गुत्तेदारांवर मेहरबानी दाखवतात. परिणामी रस्ता कामाला गती मिळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
सेलू तालुक्यातील देऊळगाव ते डासाळा, सेलू-रवळगाव - आहेर बोरगाव - शिंदे टाकळी या रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. सेलू ते मानवत रोड या रस्त्यावरील कार्पेट केले. मात्र सीलकोट करण्यासाठी डांबर सहज उपलब्ध होत नाही. लवकरच रखडलेली कामे पूर्ण करू.
-बळीराम माने,
शाखा अभियंता ,सा.बां.विभाग सेलू

Web Title: Parbhani: The speed of the road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.