परभणी : पाणी उपसा रोखण्यासाठी पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:24 AM2018-10-16T00:24:33+5:302018-10-16T00:25:57+5:30

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेले पाणी केवळ पिण्यासाठी वापरल्या जावे, या उद्देशाने प्रकल्पातील पाण्याचा बेकायदेशीर उपसा थांबविण्यासाठी तालुकास्तरावर पथके स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Parbhani: Squad to prevent water drainage | परभणी : पाणी उपसा रोखण्यासाठी पथके

परभणी : पाणी उपसा रोखण्यासाठी पथके

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेले पाणी केवळ पिण्यासाठी वापरल्या जावे, या उद्देशाने प्रकल्पातील पाण्याचा बेकायदेशीर उपसा थांबविण्यासाठी तालुकास्तरावर पथके स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये यावर्षी ६२.३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. हे पाणी उन्हाळ्यापर्यंत वापरावे लागणार आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रकल्प निहाय्य पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. जलाशयातील पाणीसाठ्याचा बेकायदेशीर उपसा होतो. जलाशयाचा परिसर विस्तीर्ण असल्याने संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवणे जलसंपदा व जलसंधारण विभागाला शक्य होत नाही. परिणामी अनाधिकृत पाणी उपसा वाढतो व पाण्याचे नियोजन कोलमडते. पाणीपुरवठा करणाºया योजनांवरही याचा परिणाम होतो. उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजना अस्तित्वात असलेल्या गावांनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. ही वेळ येऊ नये, यासाठी तालुकास्तरावर समिती गठीत करून पथके स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे.
या समितींतर्गत स्थापन केलेल्या पथकांनी प्रत्यक्ष जलाशयावर जाऊन अवैध पाणी उपसा करणाºयांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या भागात अवैध उपसा होऊ नये, यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकाºयांचाही पथकामध्ये समावेश करण्यात आला आहे. या पथकांनी गांभीर्याने पाणी उपसा रोखला तर आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट शिथील होऊ शकते.
समितीत : आठ अधिकाºयांचा समावेश
अनाधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी तालुकास्तरावर स्थापन केलेल्या समितीमध्ये १२ अधिकाºयांचा समावेश आहे. प्र्रत्येक तालुक्याचे तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष असतील. तर पाटबंधारे प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी हे सदस्य सचिव राहणार आहेत.
या शिवाय महावितरणचे उपविभागीय अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच पूर्णा पाटबंधारे विभाग, माजलगाव पाटबंधारे विभाग, निम्न दुधना प्रकल्प, लघू पाटबंधारे (राज्यस्तर), नांदेड पाटबंधारे विभाग, लघू सिंचन विभाग, मृद व जलसंधारण उपविभाग आदी विभागाच्या अधिकाºयांचा सदस्य म्हणूून या समितीमध्ये समावेश आहे.
मंडळ निहाय्य पथकांची होणार स्थापना
तालुकास्तरीय समितीने मंडळ निहाय भरारी पथकांची स्थापना करावयाची आहे. या पथकामध्ये शाखा अभियंता हे समन्वयक राहणार असून महावितरण कंपनीचे शाखा अभियंता, मंडळ अधिकारी
आणि पोलीस उपनिरीक्षकांचा सदस्य म्हणून समावेश आहे. या पथकाने प्रत्यक्ष जलाशयावर जाऊन अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत.

Web Title: Parbhani: Squad to prevent water drainage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.