परभणी : रेल्वे फाटकावर एसटी बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:34 AM2018-12-27T00:34:55+5:302018-12-27T00:35:20+5:30

शहरातील पालम रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या बेशिस्त वाहनांमुळे धारूर-नांदेड बसला अपघात झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Parbhani: ST bus accident on railway track | परभणी : रेल्वे फाटकावर एसटी बसला अपघात

परभणी : रेल्वे फाटकावर एसटी बसला अपघात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : शहरातील पालम रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या बेशिस्त वाहनांमुळे धारूर-नांदेड बसला अपघात झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर आगाराची नांंदेडकडे जाणारी बस (क्रमांक एम.एच.२०-बी.एल.०१३२) दुपारी बारा वाजेच्या सुमारास गंगाखेड बसस्थानकातून पालम, लोहा व नांदेड येथे जाणारे ५८ प्र्रवासी घेऊन निघाली असता बसस्थनकाजवळ असलेला पालम नाका रेल्वेफाटक आदिलाबाद-परळी या रेल्वेची वेळ झाल्याने फाटक बंद होते. त्यामुळे बस फाटक परिसरात थांबली होती. यावेळी फाटकाच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनांच्या रांगातून बस बाहेर काढताना मधेच येत असलेल्या दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रेल्वेफाटकाच्या बाजूला असलेल्या लोखंडी कठड्यांकडे वाहकाच्या बाजूने झुकली. वेळीच सावध चालकाने लोखंडी कठडे तोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात बस पलटी होऊ नये याची दक्षता घेत बस पुढे नेली. वाहकाच्या बाजूने बस घासत शेवटपर्यंत गेली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांची एकच धांदल उडाली. प्रसंगावधान राखत बसचालक शेख नजीर व वाहक रुख्मिणी केकान यांनी बस तेथून बाहेर काढून नांदेड रोडवरील दत्त मंदिर परिसरात रस्त्याच्या बाजूला बस थांबवून बसची पाहणी केली. यामध्ये बसचे नुकसान होऊन बस खिळखीळी झाल्याने नांदेडकडे जाणाऱ्या दुसºया बसने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना केले. अचानक घडलेल्या घटनेमुळे बसमधून प्रवास करणाºया पासधारक व ५५ प्रवाशांबरोबरच स्टाफचे तीन प्रवासी तसेच चालक, वाहक यांचा जीव भांड्यात पडला.
बस अपघातातून सुखरूप बाहेर पडल्याचे पाहून सर्वांच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.
दुतर्फा बेशिस्त लागलेल्या वाहनांमुळे अपघात
पालम नाक्यावर असलेल्या रेल्वेफाटकावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावरील वाहने वळण रस्त्याने पालम रस्त्यावर काढण्यात आली आहेत. यातच येथील रस्ता पूर्णत: खड्डेयुक्त झाल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार दिवसातून २५ ते ३० वेळा फाटक बंद होत आहे. यातच पुढे जाण्याची घाई करीत दुचाकीचालक, आॅटोचालक व छोटे वाहनधारक आपली वाहने बेशिस्तपणे रस्त्यावर दुतर्फा लावली जात असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Parbhani: ST bus accident on railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.