परभणी : एस.टी.महामंडळाच्या संपास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:47 AM2018-06-09T00:47:54+5:302018-06-09T00:47:54+5:30
वेतनवाढीचा प्रस्ताव तत्काळ मान्य करुन कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. महामंडळ कर्मचाºयांनी शुक्रवारी सकाळपासून संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर व पाथरी या आगारातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. परभणी, गंगाखेड या आगारातून वाहतूक सुरळीत असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वेतनवाढीचा प्रस्ताव तत्काळ मान्य करुन कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. महामंडळ कर्मचाºयांनी शुक्रवारी सकाळपासून संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील जिंतूर व पाथरी या आगारातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. परभणी, गंगाखेड या आगारातून वाहतूक सुरळीत असल्याचे दिसून आले.
एस.टी.महामंडळाच्या कर्मचाºयांना ३२ ते ४८ टक्के पगारवाढ होणे अपेक्षित होते. मात्र केवळ १७ ते २५ टक्क्यापर्यंतच वाढ करण्यात आली आहे. नियमित वेतनश्रेणीत सुद्धा वाढ करण्यात आली नाही. महामंडळ कर्मचाºयांच्या घरभाड्यातही कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या एकतर्फी वेतनवाढीस कर्मचाºयांनी विरोध दर्शवून शुक्रवारी सकाळपासूनच संप पुकारला. या संपाचा जिल्ह्यातील चारही आगारातील प्रवाशांना थोड्याफार प्रमाणात फटका बसल्याचे दिसून आले.
जिंतूर व पाथरी या आगारात सकाळपासूनच बससेवा बंद असल्याने प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागला. या संपात सर्व एस.टी. महामंडळातील सर्व संघटनांच्या कर्मचारी प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला असल्याचे सांगण्यात आले.