परभणी : वैद्यकीय महाविद्यालयासाठी साखळी उपोषणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:38 AM2018-10-02T00:38:03+5:302018-10-02T00:39:19+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून, सोमवारी सकाळी खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपोषण करुन वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी रेटून धरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयाच्या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून, सोमवारी सकाळी खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपोषण करुन वैद्यकीयमहाविद्यालयाची मागणी रेटून धरली.
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी खा.बंडू जाधव यांनी आंदोलन उभे केले आहे. ३ सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. ११ सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाºयांना घेराव घातला. २१ सप्टेंब रोजी महिलांनी आंदोलन करुन वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी रेटून धरली होती. चौथ्या टप्प्यामध्ये साखळी उपोषण केले जात आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून या साखळी उपोषणाला प्रारंभ झाला. सकाळी १० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकºयांच्या वतीने विलास बाबर, दत्तराव धस यांनी उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन करुन परभणी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली.
यावेळी खा.बंडू जाधव यांच्यासह जिल्हाप्रमुख विशाल कदम, सखुबाई लटपटे, भगवान धस, विलास अवकाळे, गजानन देशमुख, जनार्दन सोनवणे, गणेश घाटगे, दिलीप अवचार, सदाशिव देशमुख, पंढरीनाथ घुले, माणिक पोंढे, आत्माराम वाघ, रावसाहेब रेंगे, बंडू पांगरकर, बाळासाहेब जाधव, प्रल्हाद लाड यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन दिवसांपूर्वीच त्रिसदस्यीय समितीने परभणीला भेट देऊन या ठिकाणी उपलब्ध सुविधांची पाहणी केली आहे. दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार खा. बंडू जाधव यांनी केला आहे.