परभणी : खंडोबा यात्रा महोत्सवास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:44 AM2018-12-12T00:44:24+5:302018-12-12T00:44:29+5:30
सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील मल्हार गडावरील खंडोबा देवस्थान येथे पंचाष्टमीनिमित्त ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत यात्रा महोत्सव साजरा होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवगावफाटा (परभणी) : सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील मल्हार गडावरील खंडोबा देवस्थान येथे पंचाष्टमीनिमित्त ८ ते १५ डिसेंबर या कालावधीत यात्रा महोत्सव साजरा होत आहे.
या महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, काकडा भजन, हरिपाठ, कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गाथामुर्ती ह.भ.प. रखमाजी महाराज सातपुते यांच्या हस्ते ८ डिसेंबर रोजी कलश पूजन करून या महोत्सवास सुुरुवात करण्यात आली. अशोक महाराज थोरात हे भागवत कथेचे निरूपण करीत आहेत. १२ रोजी ह.भ.प. नरहरी महाराज भिलज, १३ रोजी हनुमान महाराज परभणीकर, १४ रोजी सचिन महाराज लावणीकर यांची कीर्तने होणार आहेत. १५ डिसेंबर रोजी नांदगाव, बोरकिनी, नागठाणा, कुंभारी, गिरगाव, वडगाव येथील भाविकांच्या दिंड्या येणार असून सकाळी १० वाजता बाळू महाराज गिरगावकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पंचक्रोशीतील भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परमेश्वर महाराज पांचाळ, रमेश महाराज मोरे, वैजनाथ महाराज गरड, भारत महाराज पांचाळ यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी रमेश बहिरट, भगवान सातपुते, अमोल सातपुते, जनार्दन मोरे, राधाकिशन मोरे, संतोष टाके, केशव गरड, महादेव मोेरे, मनोहर पांचाळ, पवन मोरे, गरड, वरणे आदी प्रयत्न करीत आहेत.
यात्रेनिमित्त कार्यक्रम
येलदरी- जिंतूर तालुक्यातील येलदरी परिसरातील सावंगी म्हाळसा येथे खंडोबा यात्रेस ८ डिसेंबरपासून सुुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त दररोज पूजा, आरती व धार्मिक विधी केल्या जात आहेत. चंपाषष्टीला या उत्सवाची सांगता होणार आहे. खंडोबा देवतेला नैवद्य दाखवून गावातून काठ्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.