परभणी : सीट बेल्ट, हेल्मेट मोहीम सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:12 AM2019-02-05T00:12:20+5:302019-02-05T00:12:38+5:30
वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात सीट बेल्ट आणि हेल्मेट वापरासाठी मोहीम सुरू करावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिल्या़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यात सीट बेल्ट आणि हेल्मेट वापरासाठी मोहीम सुरू करावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिल्या़
परभणी येथे रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपाध्याय बोलत होते़ पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला़ यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, पोलीस निरीक्षक शेख, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरसिंग ठाकूर, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश दळवे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर, शहर वाहतूक शाखेचे प्रभारी गजेंद्र सरोदे यांची उपस्थिती होती़ देवगिरी ग्लोबल अकादमीच्या विद्यार्थ्यांनीही रस्ता सुरक्षा अभियानात सहभाग नोंदविला़ देवाशिष देशपांडे याने रस्ता सुरक्षेसंदर्भात मनोगत व्यक्त केले़ यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक उपाध्याय म्हणाले, ३० व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखेच्या वतीने सीटबेल्ट, हेल्मेट मोहीम, ओव्हरस्पीड, ड्रंक अँड ड्राईव्ह, ओव्हर लोडींग व नंबर प्लेट संदर्भात कारवाया तसेच रिप्लेक्टर तसेच ट्रिपल सीट, राँगसाईड, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे आदी केसस कराव्यात, अशा सूचना केल्या़ या कार्यक्रमानंतर शहरात रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली़
४सोमवारपासून परभणी शहरात रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे़ शहर व परिसरामध्ये या पुढे शहर वाहतूक शाखेचे प्रभारी गजेंद्र सरोेदे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत उपक्रम राबविणार आहेत़