परभणीत राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी साहित्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:52 AM2018-12-02T00:52:35+5:302018-12-02T00:53:06+5:30
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेती, माती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वैचारिक मंथन व्हावे, या उद्देशाने छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने १६ डिसेंबर रोजी परभणीत एक दिवसीय राज्यस्तरीय दुष्काळ शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शनिवारी स्वागताध्यक्ष नगरसेवक अॅड.विष्णू नवले यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेती, माती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वैचारिक मंथन व्हावे, या उद्देशाने छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने १६ डिसेंबर रोजी परभणीत एक दिवसीय राज्यस्तरीय दुष्काळशेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शनिवारी स्वागताध्यक्ष नगरसेवक अॅड.विष्णू नवले यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस अॅड़ विष्णू नवले, अरुण चव्हाळ, कवी केशव खटींग, राजेंद्र गहाळ, प्रा़ सुनिल तुरूकमाने, सुभाष ढगे, यशवंत मकरंद, मंचकराव बचाटे, राज शेलार, दत्ता सुरवसे, प्रा़ सुरेश कदम, राहुल वहीवाळ, मिलिंद घुसळे, प्रा़ विनय गुजर, फेरोजभाई, हेमंत साळवे, गणेश बोरीकर, निलेश भुसारे, विजय कदम, ओंकार पौळ, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जाधव, संदीप देशमुख, योगेश ढगे यांची उपस्थिती होती़
संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत देशमुख- राहेरीकर यांची निवड करण्यात आली आहे़ साहित्य संमेलनाचे उद्घाटन स्तंभलेखक अमर हबीब यांच्या हस्ते होणार आहे़ साहित्य संमेलनास कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव, डॉ़आसाराम लोमटे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ या साहित्य संमेलनात शेती व शेतकºयांसाठी उल्लेखनीय योगनदान देणाºयांचा गौरव करण्यात येणार आहे़ १६ डिसेंबर रोजी साहित्य संमेलनात शेती-शेतकरी दुष्काळ व साहित्य आणि कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे़ या परिसंवादात कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली व्यासपीठावरून ‘बारोमासकार’ सदानंद देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते, डॉ़ शिवाजी दळणर, पत्रकार डॉ़ आसाराम लोमटे हे संवाद साधणार आहेत़ राजेंद्र गहाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया तर कथाकथनात शिवदास पोटे, बबन आव्हाड, राजा कदम, संगीता देशमुख यांचा सहभाग राहणार आहे़
कविसंमेलनात या कवींचा सहभाग
४रेणु पाचपोर यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया कविमसंलनात प्राचार्य गोविंद गायकी, अमृत तेलंग, अर्चना डावरे, संतोष नारायणकर, श्रीनिवास मस्के अरविंद सगर, शिवाजी मरगीळ, प्रा़ कल्याण कदम, प्रा़ राम कठारे, चंद्रकांत कावरखे, प्रमोद देशमुख, यशवंत मकरंद, शरद ठाकर, सुरेश हिवाळे, प्रेमानंद शिंदे, संगीता देशमुख, आण्णा जगताप, राजेश रवले हे सहभागी होणार आहेत़ कविसंमेलनाचे सूत्रसचांलन कवी केशव खटींग हे करणार आहेत़