परभणी : पोलीस कर्मचाऱ्यासह चौघांच्या घरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:46 AM2018-09-06T00:46:16+5:302018-09-06T00:47:40+5:30
जिंतूर शहरातील संभाजीनगर भागातील एका पोलीस कर्मचाºयासह चार जणांच्या घरी एकाच रात्री चोरी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी रात्री २ ते ३ च्या सुमारास घडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (जि. परभणी) : जिंतूर शहरातील संभाजीनगर भागातील एका पोलीस कर्मचाºयासह चार जणांच्या घरी एकाच रात्री चोरी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी रात्री २ ते ३ च्या सुमारास घडली़
जिंतूर शहरातील संभाजीनगर येथील सेवानिवृत्त लेखाधिकारी बळीराम बाळू चव्हाण हे गोकूळ आष्टमीनिमित्त त्यांच्या कवडा या मूळ गावाकडे मंगळवारी सकाळी गेले होते़ ते ५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता जिंतूर येथे आले असता, त्यांच्या घराचा कडीकोंडा तुटल्याचे लक्षात आल़े़ त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले़ तसेच कपाटात ठेवलेले ३ तोळे सोन्याचे गंठण, ११ ग्रॅम सोन्याचे लॉकेट, १४ ग्रॅमचे सोन्याचे एक गंठण, ७, ५, ३, ४, १, ३़५, ५, ४ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या व अन्य सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख १९ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ तसेच त्यांच्या शेजारी राहणारे पोलीस कर्मचारी पांडुरंग साहेबराव तुपसमुंदर यांच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी वॉचमनसाठी तयार केलेल्या शेडमधील २० हजार रुपये किंमतीचा टीव्ही व २ हजार रुपये किंमतीचे दागिने असा २२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ याबाबत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुसरी तक्रार रवि रामलाल चोरडिया यांनी दिली आहे़ त्यामध्ये मंगळवारी रात्री त्यांच्या घरातून रोख ८० हजार रुपये, सोन्याचे-चांदीचे दागिने, टीव्ही असा एकूण ४ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे नमूद करण्यात आले आहे़ यावरून जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या शिवाय अन्य एका ठिकाणीही चोरीची घटना घडली़ परंतु, जिंतूर पोलिसांकडे तक्रार मात्र आली नव्हती़