परभणी : सेलू शहरात उभ्या कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:51 PM2019-04-27T23:51:39+5:302019-04-27T23:51:50+5:30

जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, दिवसभर कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आगीच्या घटनांची चिंता लागली आहे़ मागील काही दिवसांमध्ये या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे़

Parbhani: Stomach taken by vertical car in the city of Selu | परभणी : सेलू शहरात उभ्या कारने घेतला पेट

परभणी : सेलू शहरात उभ्या कारने घेतला पेट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली असून, दिवसभर कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता आगीच्या घटनांची चिंता लागली आहे़ मागील काही दिवसांमध्ये या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे़
सेलू तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याबरोबरच मागील काही दिवसांपासून कडक उन्हाचा सामना सेलूकरांना करावा लागत आहे़ उन्हाचा पारा ४०-४२ करीत ४५ अंशावर पोहचल्याने नागरिक त्रस्त आहेत़ दिवसा घराबाहेर पडणेही अवघड होईल, असे ऊन सेलूकरांना त्रस्त करून सोडत आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाचा त्रास वाढला आहे़ शेतांमध्ये पिके शिल्लक नसली तरी रबी हंगामातील ज्वारी व इतर पिके काढून ठेवली आहेत़ त्यामुळे शेतशिवार ओसाड पडले आहे़ शेतांमध्येच ठिक ठिकाणी ज्वारीच्या पेंढ्या रचून ठेवल्या असून, दिवसभराच्या उष्णतेने या पेंढ्या पेट घेत आहेत़ त्यामुळे तालुक्यात कडब्याला आग लागण्याच्या घटनांही वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत़ शुक्रवारी शहरात एका कारने पेट घेतल्याची घटना घडली़ अचानक कार पेटल्याने परिसरातील नागरिकांना काय झाले ते समजलेच नाही; परंतु, शनिवारी दिवसभर ऊन वाढले होते़ रात्रीही उष्णता अधिक प्रमाणात होती़ त्यातूनच कारने पेट घेतल्याची घटना घडली़
उभी कार जळून खाक
सेलू शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एमएच ११ सीजी-७४४३ या क्रमांकाच्या कारला शुक्रवारी रात्री ८़३० च्या सुमारास अचानक आग लागली़ सातारा येथील परशूराम दावडकर व बाळासाहेब सावंत हे दोघे मोबाईल टॉवरची दुरुस्ती करण्यासाठी परभणीहून आले होते़ दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक त्यांच्या कारने पेट घेतल्याचे लक्षात आले़ नागरिकांनी तातडीने मदतकार्य करीत अग्नीशमन दलास पाचारण केले़ मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली़ सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही़ पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली़

Web Title: Parbhani: Stomach taken by vertical car in the city of Selu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.