परभणीत रस्त्यालगतचे साहित्य केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:57 PM2017-11-28T23:57:19+5:302017-11-28T23:57:53+5:30
शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी मंगळवारी शहरात मोहीम राबवून वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील सर्व साहित्य जप्त केले आहे. या मोहिमेमुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून मोहिमेचे स्वागत होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी मंगळवारी शहरात मोहीम राबवून वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील सर्व साहित्य जप्त केले आहे. या मोहिमेमुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून मोहिमेचे स्वागत होत आहे.
परभणी शहरातील स्टेशनरोड, गांधी पार्क, गुजरी बाजार आणि इतर प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजुला अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली होती. वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने मंगळवारी ही मोहीम राबवून रस्ते वाहुकीसाठी मोकळे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक खान, महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे विनय ठाकूर, होर्डिग्ज विभागाचे डॉ.विनोद ननवरे यांच्यासह कर्मचाºयांनी सकाळपासूनच या मोहिमेला सुरुवात केली. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही मोहीम सुरु झाली. स्टेशनरोड, नारायणचाळ, अष्टभुजा देवी मंदिर, गांधी पार्क, शिवाजी चौक, नानलपेठ कॉर्नर ते महाराणा प्रताप चौकापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने या भागातील व्यापाºयांनी त्यांच्या दुकानातील साहित्य, नामफलक, दुकानाची जाहिरात करणारे फलक रस्त्यावरच दर्शनी भागात लावले होते. या साहित्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असे. काही किरकोळ व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेलाच टेबल, खुर्च्या टाकून चहा- पान स्टॉलचे दुकान सुरू केले होते.