परभणी : शिवजयंतीची जोरदार तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:12 AM2018-02-19T00:12:31+5:302018-02-19T00:12:48+5:30

‘एक शहर एक जयंती’ या संकल्पनेतून परभणीत सार्वजनिक शिवजयंती सोहळा सोमवारी साजरा केला जात आहे़ शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाºया मिरवणुकीवर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार असल्याने ही मिरवणूक आकर्षण ठरणार आहे़

Parbhani: Strong preparation of Shiv Jayanti | परभणी : शिवजयंतीची जोरदार तयारी

परभणी : शिवजयंतीची जोरदार तयारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ‘एक शहर एक जयंती’ या संकल्पनेतून परभणीत सार्वजनिक शिवजयंती सोहळा सोमवारी साजरा केला जात आहे़ शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाºया मिरवणुकीवर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार असल्याने ही मिरवणूक आकर्षण ठरणार आहे़
१९ फेब्रुवारी रोजी परभणी शहरात शिवजयंती साजरी केली जात आहे. सर्वसमावेशक आणि व्यापक स्वरुपात शिवजयंती साजरी करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून महिला, पुरुष, युवक, युवतींना सहभागी होता यावे, यासाठी दुपारी ३ वाजता शिवजयंती मिरवणूक काढली जाणार आहे़ येथील शनिवार बाजार येथून मिरवणुकीस प्रारंभ होईल. शिवाजी चौक, गांधी पार्क, विसावा कॉर्नरमार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येईल़ मिरवणुकीत अंबारीसहीत हत्ती, शिवरायांची मूर्ती, ५१ घोडे, ५१ ऊंट, तलवारबाजी महिलांचे पथक, हलगी पथक, मल्लखांब, गोंधळी, झांज पथक, ढोल पथक आकर्षण राहणार आहे़ मिरवणुकीस प्रारंभ झाल्यानंतर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होणार आहे़ त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यावरही हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली जाणार आहे़
विशेष म्हणजे, सार्वजनिक शिवजयंती मिरवणुकीचे ड्रोण कॅमेºयाद्वारे छायाचित्रणही केले जाणार आहे़ मिरवणुकीत सहभागी होणाºया नागरिकांसाठी अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ शिवप्रेमी नागरिकांनी या मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने करण्यात आले आहे़
विद्युत रोषणाईला मनपाचा खो
दरवर्षी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता, रंगरंगोटी व विद्युत रोषणाई केली जाते़ जयंतीच्या एक दिवस अगोदरच महापालिकेमार्फत ही कामे केली जातात़ मात्र यावर्षी मनपाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई केली नाही़ तसेच दिवसभरात स्वच्छतेची कामेही झाली नाहीत़ त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे़

Web Title: Parbhani: Strong preparation of Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.