परभणी : श्री विसर्जनासाठी जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:45 AM2019-09-12T00:45:12+5:302019-09-12T00:45:41+5:30
दहा दिवसांपासून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असलेल्या श्री गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी होत आहे़ या पार्श्वभूमीवर स्थापना केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते़ शहरातून वाजत-गाजत मिरवणुका काढून बाप्पांना निरोप दिला जातो़ या काळात कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात तगडा बंदोबस्त लावला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दहा दिवसांपासून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असलेल्या श्री गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी होत आहे़ या पार्श्वभूमीवर स्थापना केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते़ शहरातून वाजत-गाजत मिरवणुका काढून बाप्पांना निरोप दिला जातो़ या काळात कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात तगडा बंदोबस्त लावला आहे़
जिल्ह्यात यावर्षी गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट होते़ पावसाच्या अनियमितपणामुळे पीक परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या समस्या निर्माण झाल्या होत्या़ अशाही परिस्थितीत गणेश भक्तांनी उत्साहात श्री गणरायांचे स्वागत केले़ परभणी शहरासह जिल्हाभरात ठिक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली़ त्याचप्रमाणे घरोघरी श्रींची स्थापना करून हा उत्सव साजरा केला जात आहे़
१२ सप्टेंबर रोजी या उत्सावाची सांगता होत असून, जिल्हाभरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे़ तसेच विहीर, नदीपात्र, बंधारे आदी परिसरातही पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे़ परभणी शहरामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला़ शहरातील प्रमुख मार्गावर ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात़ सायंकाळी ६ वाजेपासून सुरू होणाऱ्या या मिरवणुका दुसºया दिवशीच्या पहाटेपर्यंत चालतात़
मिरवणूक काळात युवकांचा उत्साह शिगेला जातो़ या उत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधही घातले आहेत़ शहरातील विसर्जन मार्गावर उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ त्याचप्रमाणे संपूर्ण मार्गावर ठिक ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉर्इंट लावले आहेत़
गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान, महानगरपालिकेसह विविध राजकीय पक्षांच्या वतीने गणेश भक्तांचे स्वागत केले जाते़ शिवाजी चौक, गुजरी बाजार या ठिकाणी स्टेज उभारून गणेश भक्तांचा उत्साह वाढविला जातो़ एकंदर गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांसह जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनानेही तयारी केली आहे़
डॉल्बीच्या वापरास बंदी
४श्री गणेश विजर्सन मिरवणुकी दरम्यान, डॉल्बी साऊंड सिस्टीम वापरण्यास जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी एका आदेशाने बंदी घातली आहे़ पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिलेल्या अहवालावरून आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे़ त्यामुळे विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांना डॉल्बीचा आवाज म्युट करूनच मिरवणूका काढाव्या लागणार आहेत़ आरोग्यास बाधा पोहचू नये, या उद्देशाने जिल्हाधिकाºयांनी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे़
जलशुद्धीकरण केंद्र : उभारले बॅरिकेटस्
४शहरातील सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने जलशुद्धीकरण केंद्र परिसरात ५० बाय ५० फुट आकाराचा आणि १८ फुट खोलीचा हौद तयार केला आहे़ या ठिकाणी गणेश भक्तांची गर्दी होवू नये, यासाठी बॅरिकेटस् उभारण्यात आले आहेत़ जलशुद्धीकरण केंद्र परिसरात येण्यासाठी आणि गणरायाच्या विसर्जनानंतर परत जाण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग तयार केले आहेत़
४ बुधवारी या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली़ तसेच हौद पाण्याने भरून घेण्यात आला़ या ठिकाणी दोन्ही प्रवेशद्वारांंवर प्रत्येकी १ आणि विसर्जन हौदाच्या ठिकाणी २ असे ४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ त्याचप्रमाणे पोलिसांचा बंदोबस्तही राहणार आहे़
सीसीटीव्ही कॅमेºयांची राहणार नजर
गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असतानाच परभणी शहरात प्रमुख चौक आणि मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ काही महिन्यांपूर्वी शहरामध्ये या कॅमेºयांची संख्या वाढविण्यात आली असून, कॅमेºयांच्या माध्यमातून अनुचित प्रकारांवर पोलीस यंत्रणा नजर ठेवणार आहे़
निर्माल्य, मूर्तींचे करणार संकलन
४महानगरपालिकेने गणेश विजर्सनासाठी जय्यत तयारी केली आहे़ शहरातील विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, या मार्गावर लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे़ त्याचप्रमाणे घरगुती गणेश मूर्ती एकत्रित करून महापालिका स्वत: जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या हौदात या मूर्तीचे विजर्सन करणार आहे़ दहा दिवस जमा झालेल्या निर्माल्याचा दुरुपयोग होवू नये, या उद्देशाने ठिक ठिकाणी विसर्जनस्थळी निर्माल्य कलश ठेवण्यात आला आहे़ गणेश भक्तांनी या निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकावे़ बालविद्या मंदिर नानलपेठ, जिंतूर रोडवरील गणपती चौक, दर्गा रोडवरील कृत्रिम रेतन केंद्र, गांधी पार्क, खंडोबा बाजार, धार रोड, दुर्गादेवी मंदिर समाधान कॉलनी, विद्यापीठ गेट, देशमुख हॉॅटेल गणपती चौक आणि शिवशक्ती बिल्डींग वसमत रोड या ठिकाणी घरगुती गणपती संकलन केंद्र स्थापन केले आहेत. नागरिकांनी या संकलन केंद्रातच गणेशमूर्ती द्याव्यात, असे आवाहन मनपाने केले आहे.