परभणी : शिक्षक, प्राध्यापकांच्या उपोषणाला जोरदार प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:32 AM2018-10-03T00:32:42+5:302018-10-03T00:33:17+5:30
जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याला शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय मंजूर करावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला.
शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयासाठी खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये आंदोलने केले जात आहे. १ आॅक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. १ आॅक्टोबर रोजी शेतकऱ्यांनी या साखळी उपोषणाला सुरुवात केली. २ आॅक्टोबर रोजी खा. बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक व प्राचार्यांनी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत उपोषण केले. यावेळी प्राचार्य डॉ.वसंत भोसले, प्रा.डॉ.पंढरीनाथ धोंडगे, प्रा.डॉ.सुनील मोडक, संजय धर्माधिकारी, शिक्षक सेनेचे बाळासाहेब राखे, सुनील काकडे, शिक्षक संघटनेचे डी.सी. डुकरे, चंद्रकांत मोरे, ज्ञानेश्वर लोंढे, मुंजाजी गोरे, विनोद कनकुटे, मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर, आनंद देशमुख, भाजपाचे मोहन कुलकर्णी, बाळासाहेब पवार, देविदास उमाटे, विश्वंभर काटवटे, जगदीश जोगदंड, महेश पाटील, गिरीष पिंपळगावकर, संतोष गायकवाड, माधव घयाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. लक्ष्मीकांत क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.पंढरीनाथ धोंडगे यांनी आभार मानले. उपोषणा दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, विधानसभा प्रमुख माणिक पोंढे, नगरसेवक अतुल सरोदे आदींनी भेट दिली.
आज वारकºयांचे उपोषण
साखळी उपोषणामध्ये ३ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील वारकरी सहभाग नोंदविणार आहेत. परभणी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे, यासाठी वारकरी मंडळीही उपोषण करुन मागणी रेटून धरणार आहेत.