परभणी : सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:29 AM2019-01-15T00:29:43+5:302019-01-15T00:30:45+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दुष्काळी परिस्थितही विद्यार्थ्यांना जीवनाश्यक सुविधा मिळत नसल्याने १४ जानेवारी रोजी आॅल इंडिया स्टुंडटस् फेडरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दुष्काळी परिस्थितही विद्यार्थ्यांना जीवनाश्यक सुविधा मिळत नसल्याने १४ जानेवारी रोजी आॅल इंडिया स्टुंडटस् फेडरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
विद्यापीठाने वसतिगृहाच्या शुल्कात केलेली वाढ रद्द करावी, दुष्काळामुळे वसतिगृहाचे शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह वसतिगृह भत्ता विद्यार्थ्यांना अदा करावा, कृषी पदवी अभ्यासक्रमाचा निकाल त्वरित घोषित करावा, एससी, एसटी, एनटीच्या विद्यार्थ्यांसाठीचे विद्यावेतन तात्काळ अदा करावे, वनामकृवितील प्रशासकीय पदावर प्रशासकीय दर्जाच्या व्यक्तीची नेमणूक करावी, उपकुलसचिव एच.एल.भांगे यांच्याकडे सप्टेंबर २०१७ पासून देय असलेले वेतन तात्काळ वसूल करावे, कमवा व शिका या योजनेसाठी विशेष विभाग निर्माण करुन गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा, शासकीय नियमानुसार तीन वर्षातून एक वेळा प्राध्यापकांच्या बदल्या कराव्यात इ. मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. एआयएसएफचे संदीप सोळुंके, प्रदीप गोरे, गणेश रनौर, विश्वास कदम, लखन जोशी, राजेश भोसले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.