परभणी :आॅनलाईन परिक्षेने विद्यार्थी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:27 AM2018-02-06T00:27:12+5:302018-02-06T00:28:13+5:30

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकविल्या जाणाºया ३५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय ऐनवेळी झाल्याने परभणी येथील विविध अभ्यासक्रमाच्या (ट्रेडच्या) विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले़ सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आॅफलाईन परीक्षा घेण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली़

Parbhani: Students conduct online tests | परभणी :आॅनलाईन परिक्षेने विद्यार्थी रस्त्यावर

परभणी :आॅनलाईन परिक्षेने विद्यार्थी रस्त्यावर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकविल्या जाणाºया ३५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय ऐनवेळी झाल्याने परभणी येथील विविध अभ्यासक्रमाच्या (ट्रेडच्या) विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले़ सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आॅफलाईन परीक्षा घेण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली़
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय केंद्रांवर प्रथम सत्राची परीक्षा घेतली जाणार होती़ परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुमारे ७०० विद्यार्थी ३५ वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत आहेत़ या विद्यार्थ्यांची दरवर्षी आॅफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेतली जाते़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच परिक्षेची तयारी केली होती़
५ व ६ फेबु्रवारी रोजी नियोजित परीक्षा होणार होती; परंतु, ऐनवेळी व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी पत्र पाठवून जिल्हास्तरावर होणारी ही परीक्षा ओएमआर बेसड् (आॅफलाईन) न घेता आॅनलाईन संगणकावर परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या़ तसेच याच पत्राद्वारे परिक्षेचे वेळापत्रकही बदलल्याचे जाहीर करण्यात आले़ त्यात १७ फेब्रुवारीपासून आॅनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़
आॅफलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची तयारी करून विद्यार्थी सोमवारी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात दाखल झाले़ मात्र या परीक्षा आॅनलाईन घेतल्या जाणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिल्यानंतर एकच गोंधळ उडाला़ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनेक अभ्यासक्रमामध्ये प्रत्यक्ष संगणकाचा वापर होत नाही, असे असताना संगणकावर परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते़ त्यामुळे या निर्णयाला विरोध करीत विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला़ हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गंगाधर जवंजाळ हे देखील परीक्षा केंद्रावर दाखल झाले़ या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची बाब त्यांनी प्राचार्यांना निदर्शनास आणून दिली़ त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यासह जिल्हाधिकाºयांनाही निवेदन देऊन आॅनलाईन परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणेच आॅफलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली़ निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गंगाधर जवंजाळ, केशव काळे, पांडूरंग काळे, अतिष खाकरे, आत्माराम पुजारी, नितीन वाव्हुळे, गोपाळ साबळे, अमोल जाधव, मंचक सोनुले, आकाश इंगोले, बालाजी पांचाळ, सुरेश पुंडगे, ज्ञानेश्वर हांडगे, आनंद भुजबळ, अमर साळुंखे, आकाश रेंगे आदींच्या सह्या आहेत़
केंद्रावर भौतिक : सुविधांचा अभाव
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संगणकाशी संदर्भात एकही अभ्यासक्रम नाही़ त्यामुळे प्रशिक्षण संस्थेत संगणकांची कमतरता आहे़ प्रशासकीय कामकाजासाठी वापरल्या जाणाºया संगणकांवरच परीक्षा घ्यावी लागणार आहे़ त्यामुळे ही परीक्षा घेताना अडचणी निर्माण होवू शकतात़ तसेच विद्यार्थ्यांना पूर्व कल्पना न देता ऐनवेळी आॅनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होवू शकते़ अशा वेळी परीक्षेच्या संदर्भाने उचित निर्णय घ्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे़

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून आॅनलाईन परीक्षा घेण्याचे पत्र आम्हाला ३ फेबु्रवारी रोजी प्राप्त झाले़ या पत्रानुसार आम्ही इन्फ्रस्ट्रक्चर उपलब्ध नसल्याचे कळविले आहे़ विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतच आॅनलाईन परिक्षेसाठी आजपासूनच १७ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे़ तसे बॅचेसचे नियोजनही केले आहे़ वरिष्ठांच्या निर्णयानुसार प्रशिक्षण संस्थेतील एम़ए़बी़आऱ, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स, फिटर आदी सहा अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅफलाईन पद्धतीने सुरू आहेत़ उर्वरित ३५ ट्रेडच्या परीक्षा आॅनलाईन होणार आहेत़
-एम़डी़ देशमुख, प्राचार्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी

Web Title: Parbhani: Students conduct online tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.