परभणी : २४ गावांसाठी मागविले ३० लाखांचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 11:36 PM2019-09-03T23:36:51+5:302019-09-03T23:37:22+5:30
२०१८ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी अनुदानाचे वाटप अजूनही पूर्ण झालेले नाही. दोन तालुक्यांतील २४ गावांसाठी तहसीलदारांनी आगाऊची २९ लाख ९९ हजार रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे नोंदविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : २०१८ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी अनुदानाचे वाटप अजूनही पूर्ण झालेले नाही. दोन तालुक्यांतील २४ गावांसाठी तहसीलदारांनी आगाऊची २९ लाख ९९ हजार रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे नोंदविली आहे.
२०१८ मध्ये जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अनियमित आणि अल्प पावसामुळे खरिपाचे उत्पादन हाती लागले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकºयांवर ओढवलेले हे संकट काही प्रमाणात दूर करण्यासाठी राज्य शासनाने खरीप हंगामामध्ये बाधित झालेल्या पिकांसाठी हेक्टरी ६ हजार ८०० रुपये प्रति हॅक्टरी याप्रमाणे मदत देऊ केली होती. दोन टप्प्यांमध्ये ही मदत शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन महसूल प्रशासनाने केले. मात्र २०१९ मधील खरीप हंगाम ओसरत आला तरीही मागील वर्षांच्या दुष्काळी अनुदानाचे वाटप अद्यापही पूर्ण झाले नसल्याची परिस्थिती दिसत आहे.
मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. पावसाळ्याचे अडीच महिने उलटले; मात्र समाधानकारक पाऊस झाला नाही. खरीप हंगामातील पिके पावसाअभावी कोमेजण्याच्या अवस्थेत आहेत. पीक कर्जही वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी यावषीर्ही आर्थिक पेचात आहे. असे असताना किमान मागील वषीर्चे दुष्काळी अनुदान तरी सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा होती. मात्र परभणी आणि मानवत या दोन तालुक्यात दुसºया टप्प्यातील अनुदान अद्यापही शेतकºयांपर्यंत पोहोचले नाही.
परभणी तालुक्यातील २२ गावांतील शेतकºयांना अनुदानाचे वाटप करण्यासाठी प्रशासनाला २८ लाख ५९ हजार रुपयांची रक्कम कमी पडली आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाने आता कुठे जिल्हाधिकाºयांकडे अनुदानापोटी रक्कम देण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील दोन गावांसाठी १ लाख ४० हजार ९९६ रुपयांची रक्कम कमी पडली असून, या रकमेची मागणी जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.
एकंदर दोन्ही तालुक्यांमध्ये दुष्काळी अनुदानाचे वाटप रखडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून २९ लाख ९९ हजार रुपयांचा निधी दोन्ही तालुका प्रशासनाकडे वर्ग झाल्यानंतर उर्वरित शेतकºयांना दुष्काळी अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
२०२ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यावर
४दुष्काळी भागातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून मिळालेल्या मदतीपैकी २०२ कोटी १९ लाख ५३ हजार २३२ रुपये आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
४त्यात परभणी तालुक्यात ५५ कोटी ७९ लाख ५५ हजार ७५५ रुपये, पालम तालुक्यात २८ कोटी ६० लाख ४१ हजार ८३० रुपये, पाथरी तालुक्यात २९ कोटी ५९ लाख ४६ हजार २८३ रुपये, मानवत तालुक्यात २६ कोटी ८० लाख ६ हजार ६९४ रुपये, सोनपेठ तालुक्यात २० कोटी ९० लाख ३४ हजार २०४ रुपये.
४सेलू तालुक्यात सर्वाधिक ४० कोटी ४९ लाख ६८ हजार ४६६ रुपयांची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यावर जमा झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
समर्पण निधीतूनच दिली जाणार रक्कम
४जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांना मदतीचे वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी परभणी आणि मानवत तहसीलदारांनी नोंदविली आहे.
४ जिल्हा प्रशासनाकडे यापूर्वीच १ कोटी १ लाख रुपये समर्पित झाले असून, या निधीतूनच दोन्ही तालुक्यांना मागणीप्रमाणे निधी दिला जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
या गावांसाठी मागविला निधी
४परभणी तालुक्यातील सुरपिंपरी, बोरवंड बु., देवठाणा, साबा, असोला दुरडी, मुरुंबा, मिरखेल, वरपूड, आंबे टाकळी, ब्राह्मणगाव, कौडगाव, पारवा, परभणी, आर्वी, गोविंदपूर, पिंगळी, शेंद्रा, नांदखेडा, तट्टुजवळा, वांगी आणि मांडवा या गावासांठी जिल्हा प्रशासनाने निधी मागविला आहे.
एक कोटी रुपयांचा निधी समर्पित
४दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांना वितरित करण्यासाठी प्राप्त झालेल्या अनुदाना पैकी काही रक्कम शिल्लक राहिल्याने चार तालुक्यातील तहसीलदारांनी सुमारे १ कोटी १ लाख १७ हजार ३४६ रुपयांचा निधी जिल्हाधिकाºयांकडे समर्पित केला आहे.
४त्यामध्ये पाथरी तालुक्याने ९० लाख रुपये, मानवत तालुक्याने १ हजार ३१३ रुपये, सोनपेठ तालुक्यातून ६ लाख ४ हजार १८२ रुपये आणि सेलू तालुक्याने ११ लाख १६ हजार ३३ रुपये जिल्हा प्रशासनाकडे समर्पित केले आहेत.