परभणी, पाथरीत अचानक तपासणी;पाच दुकानमालकांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:29 PM2019-08-23T23:29:27+5:302019-08-23T23:30:08+5:30

दुकानातील व्यवहारांची नोंद ठेवली जात नसल्याच्या कारणावरुन दहशतवाद विरोधी पथकाने परभणी व पाथरी येथील पाच दुकानमालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

Parbhani, a sudden inspection in stone; | परभणी, पाथरीत अचानक तपासणी;पाच दुकानमालकांवर गुन्हे

परभणी, पाथरीत अचानक तपासणी;पाच दुकानमालकांवर गुन्हे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दुकानातील व्यवहारांची नोंद ठेवली जात नसल्याच्या कारणावरुन दहशतवाद विरोधी पथकाने परभणी व पाथरी येथील पाच दुकानमालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
येथील दहशतवाद विरोधी पथकाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून घरमालक, लॉज मालक, सायबर कॅफे मालक, मोबाईल सीम विक्रेते, भंगार विक्रेते, प्रिटींग प्रेस चालक, विस्फोटक गोदाम परवानाधारक आदींची तपासणी केली जात आहे. त्यांच्याकडून खरेदी- विक्री व्यवहारांच्या नोंदीची पडताळणी केली जात आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली, २१ आॅगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांच्या नेतृत्वाखाली सपोउपनि.शेख इब्राहीम, भारत नलावडे, दत्तात्रय चिंचाणे, अजहर पटेल, आरेफ कुरेशी, दीपक मुदिराज यांच्या पथकाने परभणीतील जिंतूररोड भागातील गुडलक अ‍ॅटो कन्सल्टींग या दुचाकी खरेदी-विक्री दुकानाची तपासणी केली. त्यावेळी सदरील वाहने कोणाकडून खरेदी केली, त्या वाहनांच्या कागदपत्रांच्या नोंदी आदी बाबतही माहिती या पथकाला आढळून आली नाही. त्यामुळे दुकान मालक सय्यद इस्माईल यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ आॅगस्ट रोजी पाथरी येथील सेलू कॉर्नर जवळील लॉजची तपासणी केली असता त्यांच्याकडेही ग्राहकासंदर्भातील नोंदी आढळून आल्या नाहीत. त्यामुळे मॅनेजर मारोती कोकाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. जि.प. शाळा मैदानाजवळील रौफ स्क्रॅप भंगार दुकानाची तपासणी केली असता तेथेही नोंद आढळून आल्या नाहीत. त्यामुळे रौफ अन्सारी यांच्यावर गुन्हा दाखल केला. येथीलच साई मंदिर रस्त्यावरील खलील स्क्रॅप दुकान, लोकसेवा स्क्रॅप दुकान या दोन्ही दुकानांची तपासणी केली असता या दुकानातही नोंदीचा अभाव आढळून आला. त्यामुळे मालक खलील चाँद शाह व शोएब अहेमद यांच्यावर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पावणे दोन लाखांचा गुटखा, पानमसाला केला जप्त
४पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ आॅगस्ट रोजी विशेष मोहीम राबवून १ लाख ८२ हजार ६७६ रुपयांचा गुटखा व पानमसाला पाच ठिकाणी टाकलेल्या छाप्यात जप्त केला.
४परभणीतील गंगाखेड रोड भागातील फरीद कॉलनी येथे शेख फारुख शेख जिलानी याच्या घरावर छापा टाकला असता तेथे आरएमडी, वजीर, गोवा, एनपी, जाफराणी जर्दा, राजनिवास पानमसाला, विमल पानमसाला आदींचा ८६ हजार २२९ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी शेख फारुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
४रवळगाव येथे अशोक काशिनाथ राऊत याच्या राहत्या घरी २० हजार ४०० रुपयांचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
४परभणीतील वसमत रोडवरील आरोपी प्रकाश विठ्ठल भालेराव यांच्या श्री विठ्ठल जर्दा स्टोअर या दुकानात ६ हजार ११२ रुपयांचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आढळून आला. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४सोनपेठ येथील आरोपी सखाराम वाकेकर याच्या मोटारसायकलवर ६ हजार ६६० रुपयांचा गुटखा, सुगंधित सुपारी आदी मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी सोनपेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
४परभणीतील शंकरनगर भागात आरोपी शेख सादिक, शेख मुक्तार याच्या राहत्या घरी २३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्याच्यावर मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
४परभणीतील शेख शोएब शेख आयुब याच्या घरी तर शेख रियाज शेख फरीदमियाँ याच्या पानटपरीत एकूण १४ हजार ५८५ रुपयांचा गुटखा, तंबाखू, पानमसाला आढळून आला. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
४ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर अधीक्षक रागसुधा आर व पोनि. प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनील गोपीनवार, प्रकाश कापुरे, किशोर नाईक, प्रकाश कच्छवे यांच्या पथकाने केली.

Web Title: Parbhani, a sudden inspection in stone;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.