परभणी : ४२ कोटींचे अनुदान बँक खात्यावर जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:44 PM2018-06-05T23:44:13+5:302018-06-05T23:44:13+5:30

जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या ४२ कोटी १२ लाख रुपयांपैकी ४१ कोटी ९६ लाख रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले असून ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Parbhani: A sum of 42 crores has been deposited with a bank account | परभणी : ४२ कोटींचे अनुदान बँक खात्यावर जमा

परभणी : ४२ कोटींचे अनुदान बँक खात्यावर जमा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या ४२ कोटी १२ लाख रुपयांपैकी ४१ कोटी ९६ लाख रुपये बँकांकडे वर्ग करण्यात आले असून ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये शेतकºयांनी घेतलेल्या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. परिणामी कापसाचे उत्पादन घटल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. या शेतकºयांच्या मदतीसाठी राज्य शासनाने अनुदान देऊ केले आहे. तीन टप्प्यामध्ये अनुदानाचे वाटप होणार असून ४२ कोटी १२ लाख रुपयांचा पहिला टप्पा जिल्ह्याला प्राप्त झाला होता. तहसील कार्यालयामार्फत ही रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली असून शेतकºयांच्या खात्यानुसार ती प्रत्यक्ष शेतकºयांना मिळणार आहे. बोंडअळीग्रस्त शेतकºयांसाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या यादीनुसार परभणी तालुक्याला ६ कोटी ८८ लाख ९२ हजार रुपये मिळाले होते. १२ हजार १७ शेतकºयांच्या खात्यावर ६ कोटी ८७ लाख ८७ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. सेलू तालुक्यासाठी ६ कोटी ५९ लाख ८० हजार रुपये मिळाले होते. त्यापैकी १३ हजार ७८९ शेतकºयांच्या खात्यावर ६ कोटी ५३ लाख ७ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. जिंतूर तालुक्यात ११ हजार ९०१ शेतकºयांच्या खात्यावर ६ कोटी ४३ लाख ७ हजार, पाथरी तालुक्यातील १० हजार २९५ शेतकºयांच्या खात्यावर ४ कोटी २१ लाख ९१ हजार, मानवत तालुक्यातील ९ हजार ४८९ शेतकºयांच्या खात्यावर ५ कोटी २७ लाख ४४ हजार, सोनपेठ तालुक्यात ८ हजार ८४३ शेतकºयांच्या खात्यावर ४ कोटी २० लाख, गंगाखेड ७ हजार ९११ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी २४ लाख ७३ हजार, पालम ७ हजार २७१ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी ४ लाख २५ हजार आणि पूर्णा तालुक्यातील ४ हजार ९९९ शेतकºयांच्या खात्यावर २ कोटी १४ लाख २५ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. प्रशासनाला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या संपूर्ण अनुदानाचे वितरण झाले असून आता दुसºया टप्प्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
साडे तीन लाख शेतकºयांना मिळणार लाभ
परभणी जिल्ह्यात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांचा सर्व्हे जिल्हा प्रशासनाने केला होता. या सर्व्हेनंतर शेतकºयांना द्यावयाच्या रक्कमेची मागणी शासनाकडे करण्यात आली. जिल्ह्यात ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांचे बोंडअळीमुळे नुकसान झाले असून त्यासाठी १५७ कोटी ९७ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. या संपूर्ण मागणीला मंजुरी मिळाली आहे. तीन टप्प्यामध्ये हे अनुदान जिल्ह्याला मिळणार असून पहिल्या टप्प्यात ८६ हजार ५१५ शेतकºयांच्या खात्यावर ४१ कोटी ९६ लाख रुपये जमा झाले आहेत.
पेरणीपूर्वी मदत वाटप करा
संपूर्ण जिल्हाभरात पेरणीचा हंगाम आता सुरु होत आहे. यासाठी शेतकºयांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. बोंडअळीचे अनुदान वेळेत मिळाले तर पेरणी सुकर होणार असल्याने पेरणीपूर्वी अनुदान मिळावे, अशी शेतकºयांची अपेक्षा आहे. येत्या ८ दिवसांत मोठा पाऊस झाला तर प्रत्यक्ष पेरण्या सुरु होऊ शकतात. त्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने अनुदान वाटपाची तयारी करावी, अशी शेतकºयांची मागणी आहे.

Web Title: Parbhani: A sum of 42 crores has been deposited with a bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.