परभणी : धान्य घोटाळ्यातील गोदाम रक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:17 AM2018-02-22T00:17:32+5:302018-02-22T00:18:25+5:30

माजलगाव पोलिसांनी पकडलेल्या २०० पोते शासकीय धान्याच्या प्रकरणात येथील गोदाम रक्षक शेख इम्रान यास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी निलंबित केले आहे तर धान्य पुरवठा करणाºया ठेकेदाराला नोटीस बजावली आहे़

 Parbhani: Suspend warehouse guard in grain scam | परभणी : धान्य घोटाळ्यातील गोदाम रक्षक निलंबित

परभणी : धान्य घोटाळ्यातील गोदाम रक्षक निलंबित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : माजलगाव पोलिसांनी पकडलेल्या २०० पोते शासकीय धान्याच्या प्रकरणात येथील गोदाम रक्षक शेख इम्रान यास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी निलंबित केले आहे तर धान्य पुरवठा करणाºया ठेकेदाराला नोटीस बजावली आहे़
पाथरी तालुक्यातील रेशन दुकानांना धान्य पुरवठा करणारा ठेकेदाराचा टेम्पो १३ फेब्रुवारी रोजी माजलगाव येथे सापळा रचून पकडण्यात आला होता़ या टेम्पोत २०० पोते गहू, तांदूळ आणि साखर असा माल होता़ घटनेच्या दोन दिवसानंतर माजलगाव ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला़ हे धान्य पाथरी येथील शासकीय गोदामातून उचलले असल्याची माहिती समोर येताच पाथरी येथील गोदामरक्षक शेख इम्रान हा फरार झाला आहे़ त्यामुळे याच गोदामातून धान्य उचलल्याचा संशय बळावत आहे़ माजलगाव पोलीस पाथरीत झाडाझडती घेत असले तरी गोदाम रक्षक शेख इम्रान फरार झाल्याने तपासात अधिक माहिती मिळत नाही़ दरम्यान, कोणतीही रजा न देता इम्रान खान फरार झाल्याने तहसीलदारांच्या अहवालावरून जिल्हा पुरवठा विभागाने इम्रान खान याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत़
शासकीय धान्य वितरणासाठी वापरलेले वाहन शासकीय कार्यालयात न लावता काळ्या बाजारात जाणाºया धान्यासाठी वापरल्याने ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे़ आपल्याविरूद्ध दंडात्मक कारवाई का करू नये, असा खुलासा मागविला असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सखाराम मांडवगडे यांनी दिली़
धान्याचे गौडबंगाल सुटेना
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित केलेल्या धान्याची तपासणी पुरवठा विभागाने केली़ चौदाही दुकाने तपाासले़ त्यात आणि गोदामातील धान्यात तफावत आढळली नाही़ त्यामुळे माजलगाव येथे पकडलेले २०० पोते धान्य आले कोठून? व हा माल कोणाचा ? हे गौडबंगाल अद्याप सुटले नाही़

Web Title:  Parbhani: Suspend warehouse guard in grain scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.