परभणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:31 AM2018-10-23T00:31:41+5:302018-10-23T00:32:24+5:30
सावंगी म्हाळसा येथील सरपंच आणि एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी): सावंगी म्हाळसा येथील सरपंच आणि एका सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे़
सावंगी म्हाळसा येथील सरपंच कौशल्या हरि आडणे आणि सदस्य शीला रमेश कंठाळे यांचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी दिला होता़ सावंगी म्हाळसा, हिवरखेडा व येलदरी कॅम्प या तीन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांनी दिल्यानंतर जिल्हाधिकाºयांच्या या आदेशाला आव्हान देण्यासाठी सरपंच व सदस्यांनी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल केली होती़ या याचिकेवर २० आॅक्टोबर रोजी सुनावणी झाली़ या अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली असल्याची माहिती अॅड़ निळकंठ पावडे यांनी दिली आहे़
या सुनावणी दरम्यान, अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी येथील सरपंच आणि सदस्य यांना अपात्र घोषित करण्यासाठी दिलेली कारणे जिल्हाधिकाºयांनी योग्य पद्धतीने तपासली नाहीत, प्रशासकीय अधिकाºयांनी येलदरी येथील अतिक्रमणाबाबत स्थळ पंचनामाही केला नाही़ त्यामुळे सरपंच कौशल्या हरि आडणे आणि सदस्य शीला रमेश कंठाळे यांना जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या अपात्रतेच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी दिला़ या आदेशामुळे तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या सरपंच, सदस्याला दिलासा मिळाला आहे़ सावंगी म्हाळसा येथे सध्या माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाची सत्ता आहे़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ज्या कारणामुळे सरपंच व सदस्याला अपात्र ठरविले होते़ ती कारणे योग्य नसल्याचे सुनावणीमध्ये निष्पन्न झाले़ त्यामुळे जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती देण्याचा निष्कर्ष काढत अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी स्थगितीचे आदेश दिले असल्याचे अॅड़ पावडे यांनी सांगितले़
स्थळ पंचनामा केला नसल्याचे स्पष्ट
४सावंगी म्हाळसा येथील सरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरविताना दोघांनीही येलदरी वसाहतीत अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता़ परंतु, ही बाब स्पष्ट करण्यासाठी प्रशासकीयस्तरावरून स्थळ पंचनामा करणे अपेक्षित होते़ हा स्थळ पंचनामा न करताच अपात्रतेचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने आदेशाला स्थगिती दिली आहे़