परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला सायकल मोर्चा काढून पेट्रोल दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:00 AM2018-05-29T00:00:21+5:302018-05-29T00:00:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पेट्रोल दरवाढीसह शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २८ मे रोजी परभणीत जिल्हा कचेरीवर सायकल मोर्चा काढण्यात आला.
मागील पंधरा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने महागाईचा भडका उडत आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील काळी कमानपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल मोर्चा काढला. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकला. त्यानंतर मोर्चेकºयांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
भाजप सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. एकीकडे शेतकºयांना कडधान्य घेण्याचे आवाहन केले, मात्र हे धान्य खरेदी करण्यास शासनाने उदासीन भूमिका घेतली. जिल्ह्यात १३ हजार शेतकºयांची तूर खरेदीविना पडून आहे. ही तूर खरेदी करावी, खतांवरील सबसिडी दिली नसल्याने खताचे भावही वाढले आहेत. दुसरीकडे शेतमाल कवडीमोल दराने विकावा लागत आहे, या परिस्थितीला केंद्र शासन जबाबदार असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामभाऊ आवरगंड, नितीन लोहट, माणिक कदम, भगवान शिंदे, रणजित कारेगावकर, शेख जाफर, केशव आरमळ, अजीत पवार, रामकिशन गरुड, अंगद गरुड, गजानन गरुड, ज्ञानराज चव्हाण, शिवाजी ढगे, बाळासाहेब ढगे, भास्कर खटिंग आदींची उपस्थिती होती.