परभणी : पुर्णेत जाळला नीलेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:23 AM2019-01-17T00:23:24+5:302019-01-17T00:24:11+5:30
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी पूर्णा येथे शिवसेनेच्या वतीने माजी खा़ नीलेश राणे यांचा बुधवारी सकाळी ११ वाजता प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला़
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी पूर्णा येथे शिवसेनेच्या वतीने माजी खा़ नीलेश राणे यांचा बुधवारी सकाळी ११ वाजता प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला़
स्वाभिमानी संघटनेचे निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना प्रमुखांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते़ यानंतर नीलेश राणे यांच्या या विधानाचा शिवसैनिकांकडून निषेध करण्यात आला़ १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पूर्णा शहरातील शिवाजी चौक येथे शिवसैनिक एकत्र झाले़
शिवसेनेचे माजी नगरसेवक साहेबराव कदम, शहरप्रमुख मुंजा कदम, विकी वैजवाडे, विद्यानंद तेजबंद आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते़ निलेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली़ तसेच नीलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करून राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले़
यावेळी भगवान सोळंके, मारोती भंगे, बबन कदम आदींसह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़