परभणी : नागरिकांकडे करापोटी थकले १ कोटी १८ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:03 AM2019-01-24T01:03:06+5:302019-01-24T01:03:22+5:30

शहरातील नागरिकांकडे मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता व नळपट्टीचा १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा कर थकला असून या कर वसुलीसाठी जानेवारी महिन्यापासून पाच पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Parbhani: Taxpayers are tired of Rs.1.14 million | परभणी : नागरिकांकडे करापोटी थकले १ कोटी १८ लाख

परभणी : नागरिकांकडे करापोटी थकले १ कोटी १८ लाख

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): शहरातील नागरिकांकडे मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता व नळपट्टीचा १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा कर थकला असून या कर वसुलीसाठी जानेवारी महिन्यापासून पाच पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
पूर्णा शहरात मार्च २०१८ च्या नोंदणीपर्यंत ८ हजार १८९ मालमत्ताधारक आहेत. या मालमत्ताधारकांकडे विविध करांपोटी डिसेंबर २०१८ पर्यंत ८९ लाख ७१ हजार रुपये कर थकित होता. तर पालिकेकडून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यापोटी शहरातील १४०० नळधारकांकडे वर्षाअखेरपर्यंत ५४ लाख ८९ हजार रुपयांची नळपट्टी थकित होती.
या थकित करापैकी २० लाख ६० हजार रुपये मालमत्ता कर तर ५ लाख ८२ हजार रुपये नळपट्टी करापोटी वसूल करण्यात आले आहेत. त्यामुळे १ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी शहरातील नागरिकांकडे आहे. विविध योजनांच्या लोकवाट्यासाठी पालिकेला निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत केरुळकर, नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांच्या पुढाकाराने जानेवारीच्या प्रारंभापासून ५ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांनी कर वसुलीच्या कामांना सुरुवात केली आहे.
पूर्णा येथील नगरपालिकेच्या कर्मचाºयांना सहकार्य करून नागरिकांनी कर भरावा, असे आवाहन नगर पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक शेख इम्रान, कर निरीक्षक आर.बी. चव्हाण यांनी केले आहे.
पूर्णा पालिकेकडून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी कर वसुलीसाठी आलेल्या पथकांकडे आपल्या थकित कराची रक्कम जमा करून पालिकेला सहकार्य करावे.
-गंगाबाई एकलारे, नगराध्यक्षा, पूर्णा

Web Title: Parbhani: Taxpayers are tired of Rs.1.14 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.