परभणी : कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:03 AM2019-04-29T00:03:43+5:302019-04-29T00:04:07+5:30

दुष्काळी परिस्थितीत हवामानाच्या बदलाला तोंड देणारे वाण व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, येत्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली़

Parbhani: The technology of Agriculture University will extend to the farmers | परभणी : कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार

परभणी : कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दुष्काळी परिस्थितीत हवामानाच्या बदलाला तोंड देणारे वाण व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, येत्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली़
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २६ एप्रिल रोजी पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली़ या प्रसंगी रस्तोगी बोलत होते़ कार्यक्रमास कुलगुरु डॉ़ अशोक ढवण, अकोला येथून डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ विकास भाले, हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ़ रवींद्र चारी, बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे व्यवस्थापक डॉ़ एऩपी़ सिंग, वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले, डॉ़डी़एम़ मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती़
रस्तोगी म्हणाले, कमी पर्जन्यमानात रुंद वरंबा व सरी पद्धतीने पिकांची लागवड केल्यास मृद व जलसंवर्धन होऊन चांगले उत्पादन घेता येते़ त्यामुळे या तंत्रज्ञानाबाबत विस्तार कार्यकर्ते व शेतकºयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ कमी पाण्यात फळबाग व्यवस्थापनाचे कमी खर्चिक तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असून, ते शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे़
मराठवाडा व विदर्भात खरिपातील ज्वारी लागवडीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे़; परंतु, ज्वारीचे पीक पाण्याचा ताण सहन करणारे असून, मानवास अन्न आणि जनावरांना चारा पुरविणारे असल्याने ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत़
बीटी कपाशी ऐवजी कपाशीचे सरळ व देशी वाणाची लागवड तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली केल्यास कमीत खर्चात शाश्वत उत्पादन घेता येईल़ तंत्रज्ञानाच्या आधारे शेतमालाचे उत्पादन वाढू शकेल़ शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी योग्य बाजारभाव, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, साठवणूक व विपणन व्यवस्था आदींचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे़, असे ते म्हणाले़
पोक्रा अंतर्गत गावांत कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी शेती शाळेचे आयोजन केले जाणार आहे़ प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावसमुहातील प्रत्येक गावांचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व ग्रामसंजीवनी समितीद्वारे गावामध्ये हाती घ्यावयाच्या उपाययोजनांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़ यावेळी डॉ़ अशोक ढवण, डॉ़ विलास भाले, डॉ़चारी, डॉ़ सिंग यांनीही मार्गदर्शन केले़ डॉ़ आऱएऩ खंदारे यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़विजय कोळेकर यांनी आभार मानले़ कार्यशाळेस परभणी, अकोला, राहुरी कृषी विद्यापीठातील तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, मुंबई येथील आयआयटी, कृषी विभागातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़
५ हजार गावांमध्ये प्रकल्प
४पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सध्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांसह राज्यातील ५ हजार १४२ गावांत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे़
४या प्रकल्पांतर्गत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या शिफारशी व हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून केला जात आहे़

Web Title: Parbhani: The technology of Agriculture University will extend to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.