परभणी : कडब्यासह टेम्पो जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:53 PM2019-05-09T23:53:29+5:302019-05-09T23:53:49+5:30
कडब्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला वीज तारांचा स्पर्श झाल्याने कडब्यासह टेम्पो जळून खाक झाल्याची घटना ९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील आरखेड शिवारात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : कडब्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला वीज तारांचा स्पर्श झाल्याने कडब्यासह टेम्पो जळून खाक झाल्याची घटना ९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील आरखेड शिवारात घडली.
आरखेड शिवारात चाºयाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारात चाºयाला मागणी वाढली आहे. आरखेड शिवारात काही शेतकऱ्यांनी चाºयाचे उत्पादन घेतले असून या ठिकाणाहून चारा विक्री होत आहे. गुरुवारी हिप्परगा येथील काही शेतकरी आरखेड येथे आले. त्यांनी या ठिकाणी चारा विकत घेऊन तो टेम्पोमध्ये भरला. हा टेम्पो परतीच्या प्रवासाला जात असताना शिरपूर रस्त्यावर विजेच्या तारा खाली लोंबकाळात होत्या. या ताराखालून टेम्पो पुढे नेत असताना वीज तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन आगीचा भडका उडाला. त्यात टेम्पोतील कडब्याने पेट घेतला. कडबा पेटल्याची बाब काही वाहनधारकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी टेम्पोचालकाला माहिती दिली. टेम्पोचालकाने हा टेम्पो थांबवून खाली उडी घेतली. टेम्पोतील इतर शेतकºयांनाही खाली उतरविले. बघता बघता आगीचे लोट वाढत गेले. जवळपास पाण्याची व्यवस्था नसल्याने आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे आग विझवणे शक्य झाले नाही. त्यामुळे शेतकºयांसमोर हा टेम्पो आणि त्यातील कडबा जळून खाक झाला. आगीमध्ये टेम्पो पूर्णत: जळाल्याने त्याचा क्रमांक उपलब्ध झाला नाही. शेतकºयांनाही या संदर्भात माहिती नव्हती. दरम्यान, टेम्पोचा जागेवरच कोळसा झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.
झरी येथे आखाड्याला आग : शेती औजारे जळाली, चार जनावरे भाजली, हजारोंचे नुकसान
परभणी तालुक्यातील झरी येथील शेतातील आखाड्याला आग लागल्याने चार जनावरे भाजली असून शेती औजारे जळून खाक झाली. ६ मे रोजी ही घटना घडली. झरी शिवारातील गट नं.६९० मध्ये धोंडीराम बाबुराव देशमुख यांचा आखाडा आहे. या आखाड्यात जनावरे बांधलेली होती. आखाड्याशेजारीच शेतीची औजारे ठेवली होती.
सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या आखाड्याने अचानक पेट घेतला. परिसरामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने आग विझविताना अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, या घटनेत गाय, म्हैस व दोन वासरे भाजली आहेत.
तर सोयाबीन, हरभरा आणि तुरीचा भुसा जळून खाक झाला. कोळपे, औत, तिफन, स्पिंकलर आदी शेतीचे साहित्यही जळून खाक झाल्याची माहिती देशमुख यांनी दिली. घटनेनंतर तलाठी काळे यांनी पंचनामा केला असून परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
घटनांत वाढ
४पालम तालुक्यासह इतर तालुक्यांमध्ये महिनाभरापासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वीच कडबा घेऊन जाणाºया एका टेम्पोला सेलू तालुक्यातील देवगाव फाटा परिसरात आग लागली होती. तसेच पूर्णा, मानवत, पाथरी तालुक्यात कडब्याच्या गंजीने पेट घेतल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
४उन्हाची तीव्रता वाढत असल्याने कडबा पेट घेत असून काही भागात वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
४शेतातील उभ्या उसाला आग लागल्याच्याही घटना घडल्या आहेत. एकंदर या उन्हाळ्यात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.