परभणी : दहा एकर ऊस शॉर्ट सर्किटने जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:11 AM2018-10-24T00:11:11+5:302018-10-24T00:13:19+5:30

खडका शिवारातील सर्वे क्रमांक ७८ मधील ऊस पिकावर विजेची तार तुटून पडल्याने १० एकर वरील ऊस जळाल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

Parbhani: Ten acres of sugarcane short circuit burnt | परभणी : दहा एकर ऊस शॉर्ट सर्किटने जळाला

परभणी : दहा एकर ऊस शॉर्ट सर्किटने जळाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी): खडका शिवारातील सर्वे क्रमांक ७८ मधील ऊस पिकावर विजेची तार तुटून पडल्याने १० एकर वरील ऊस जळाल्याची घटना २३ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
खडका येथील शेतकरी माधवराव यादव, बाबुराव यादव, दत्तराव यादव व डिगांबर यादव या चार भावांची सर्वे नं.७८ मध्ये १० एकर जमीन आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने या चारही भावांनी आपल्या १० एकर शेतीवर ऊस पिकाची लागवड केली. पीकही चांगले आले होते. दरम्यान, या ऊस पिकावरुन वीज वितरण कंपनीची मुख्य वाहिनी गेली. २३ आॅक्टोबर रोजी या मुख्य वाहिनीतील वीजेची एक तार तुटल्याने झालेल्या शॉर्ट सर्किटमध्ये १० एकरवरील ऊस जळाला आहे. यामुळे चार भावांचे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अशा घटनेचा सामना करावा लागत आहे. पंचनामा करुन शेतकºयांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
कावलगाव वाडी येथे जळाला ऊस
परभणी : पूर्णा तालुक्यातील कावलगाव वाडी येथे शॉर्ट सर्किट झाल्याने ऊस जळाल्याची घटना २२ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. प्रभाबाई सदाशीवराव शेळके यांच्या शेतातूून वीज तारा गेल्या आहेत. या तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाले. आगीच्या थिणग्यामुळे उसाने पेट घेतला. आग वाढत असल्याचे लक्षात येता शेतकºयांनी विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत एक एकरवरील ऊस जळून खाक झाला. या घटनेत सुमारे १ लाख रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे.

Web Title: Parbhani: Ten acres of sugarcane short circuit burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.