परभणी : २५० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी दहा पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:20 AM2018-10-31T00:20:18+5:302018-10-31T00:22:04+5:30

जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या १० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडून २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी ही पथके वसूल करणार आहेत.

Parbhani: Ten squads for recovery of Rs. 250 crores | परभणी : २५० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी दहा पथके

परभणी : २५० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी दहा पथके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडून सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या १० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडून २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी ही पथके वसूल करणार आहेत.
परभणी जिल्ह्यातील औद्योगिक, घरगुती व वाणिज्य या ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी वाढत आहे. ही थकबाकी वसूल करण्याच्या दृष्टीने मुंबई येथील महावितरण मुख्यालयातील सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या वतीने विशेष १० वसुली पथकांची नेमणूक केली आहे. या पथकात औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड व परभणी येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. परभणी शहराबरोबरच ग्रामीण भागातील वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीसह वीज चोरी करणाºया ग्राहकांची तीन दिवस झाडाझडती घेतली जाणार आहे.
परभणी विभाग क्रमांक १ मध्ये लघुदाब प्रकारातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ५ हजार ६९६ वीज ग्राहकांकडे सप्टेंबर २०१८ अखेर ११० कोटी ७५ लाख रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी आहे. तर विभाग क्रमांक २ मधील ९८ हजार १८८ ग्राहकांकडे १३९ कोटी ५८ लाख रुपयांची थकबाकी आहे. असे एकूण २ लाख ३ हजार ८८४ वीज ग्राहकांकडे २५० कोटी ३३ लाख रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ कार्यालयाने जिल्ह्यासाठी नेमलेल्या एका- एका पथकामध्ये ५ ते १० अधिकाºयांचा समावेश आहे. ही दहाही पथके २९ आॅक्टोबर रोजी शहरात दाखल झाली.
३० आॅक्टोबर रोजी या पथकांनी परभणी येथील वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली.
वीज चोरीवर आळा घालण्यासाठी मोहीम
४वीज बिल थकबाकी वसुल करण्याबरोबरच वीज चोरीवर आळा घालण्याच्या उद्देशाने २९ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या स्थैर्यासाठी वीज बिलाची वसुली होणे आवश्यक आहे. सणासुदीचे दिवस पाहता वीज ग्राहकांनीही चालू वीज बिलासह आपल्याकडे असलेली थकबाकी त्वरित भरुन वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन प्रभारी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.
कृषीपंपांना वगळले
४जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कृषीपंपाच्या वीज बिलाची वसुली थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाने थकबाकी वसुलीसाठी नेमलेल्या पथकाकडून औद्योगिक, वाणिज्य व घरगुती वीज ग्राहकांचीच वसुली करण्यात येणार आहे. कृषीपंपांना या मोहिमेतून वगळल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Parbhani: Ten squads for recovery of Rs. 250 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.