परभणी:थकबाकीदार कर्जदारास दहा दिवसांचा तुरुंगवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:05 AM2019-03-23T00:05:02+5:302019-03-23T00:06:44+5:30

ट्रकसाठी घेतलेले कर्ज वेळेत न फेडल्याने कर्जदारास दहा दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके यांनी ठोठावली.

Parbhani: The tenant's jail term for the debtor's debtor | परभणी:थकबाकीदार कर्जदारास दहा दिवसांचा तुरुंगवास

परभणी:थकबाकीदार कर्जदारास दहा दिवसांचा तुरुंगवास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ट्रकसाठी घेतलेले कर्ज वेळेत न फेडल्याने कर्जदारास दहा दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके यांनी ठोठावली.
औंढा तालुक्यातील येळी येथील बाळू सोपान सांगळे यांनी चोला मंडलम इनव्हेसमेंट अ‍ॅन्ड फायनान्स कंपनीकडून टाटा ट्रक घेण्यासाठी कर्ज घेतले होते. मात्र सांगळे यांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाहीत. कंपनीने त्यांना नोटीस पाठविली. त्यानंतर लवादाकडे अर्ज केला.
लवादाने सांगळे यांना रक्कम भरावी, असा आदेश दिला; परंतु, तरीही कर्जाची रक्कम न भरल्याने कंपनीतर्फे जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला. त्
यानंतर बाळू सांगळे यांना अटक वॉरंट काढून न्यायालयासमोर हजर केले असता प्रमुख जिल्हा न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके यांनी सांगळे यास दहा दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
कंपनीतर्फे अ‍ॅड. अमित वैद्य यांनी काम पाहिले.

Web Title: Parbhani: The tenant's jail term for the debtor's debtor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.