परभणी : हमीभाव केंद्राकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:06 AM2019-01-01T01:06:34+5:302019-01-01T01:06:56+5:30

तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राने ७५४ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देऊनही केवळ १७ शेतकºयांनी २५१ क्विंटल सोयाबीनची या केंद्रावर विक्री केली आहे. दुसरीकडे डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल सोयाबीन खाजगी व्यापाºयांना शेतकºयांनी विक्री केला आहे. त्यामुळे हमीभाव मिळत असतानाही शेतकºयांनीच या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.

Parbhani: Text to Confirmation Center | परभणी : हमीभाव केंद्राकडे पाठ

परभणी : हमीभाव केंद्राकडे पाठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी ) : तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राने ७५४ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देऊनही केवळ १७ शेतकºयांनी २५१ क्विंटल सोयाबीनची या केंद्रावर विक्री केली आहे. दुसरीकडे डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल सोयाबीन खाजगी व्यापाºयांना शेतकºयांनी विक्री केला आहे. त्यामुळे हमीभाव मिळत असतानाही शेतकºयांनीच या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.
तालुक्यातील १५ हजार ८३१ हेक्टरवर सोयाबीन आणि २ हजार ४२९ हेक्टरवर मुगाचा पेरा होता. खरीप हंगामाच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनचे उत्पादन वाढेल, असे दिसून येत होते. मात्र पीक हाताला आले असताना पावसाने खंड दिल्यामुळे पिकांनी माना टाकणे सुरू केले होेते. याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर झाला होता. मानवत तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांजवळील सोयाबीन शासकीय हमीभाव दरात खरेदी करण्यासाठी तालुका खरेदी विक्री संघाकडे सुमारे ७५४ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र या पैकी केवळ १७ शेतकºयांनीच आधारभूत खरेदी केंद्रावर माल विक्री करणे पसंत केले आहे. केवळ २५१ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे.
शेतकºयांना निकषांची म्हणजे सर्व शेतमाल उत्तम प्रतीचा असणे, आधार कार्ड, सातबारा आदी कागदपत्रांची पूर्तता करून माल विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करूनही खरेदी सुरू होण्यास विलंब होत असल्याने शेतकरी या प्रक्रियेला कंटाळले होते. त्यातच केंद्रावर माल विक्री केल्यानंतर कष्टाच्या पैशासाठी वाट पहावी लागत असल्याने खाजगी व्यापाºयांना माल विकून अनेक शेतकरी मोकळे झाले आहेत.
३४९९ रुपये हमीभाव असलेले सोयाबीन खुल्या बाजारातील आडत व्यापारी ३२०० रुपये दराने खरेदी करीत आहेत. सोयाबिनचे उत्पादन अधिक असणाºया शेतकºयांनी मात्र दर वाढेल या आशेवर अजूनही सोयाबीन घरात ठेवले आहे.
खाजगी बाजारपेठेमध्ये माल विक्री केल्यानंतर शेतकºयांना पैसे नगदी मिळत असल्याने तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी आपला माल खाजगी व्यापाºयांना विक्री केला आहे. तालुक्यात डिसेंबरअखेर ३५ हजार क्विंटलवर सोयाबीन खाजगी व्यापाºयांनी शेतकºयांकडून खरेदी केल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीकडे झाली आहे.

४शहरातील नवा मोंढा परिसरात तालुका खरेदी विक्री संघाने २२ आॅक्टोबर रोजी खरेदी विक्री संघामार्फत खाजगी गोदामामध्ये भाडेतत्त्वावर शासकीय हमीभाव मूग खरेदी केंद्र सुरू केले आहे.
४या ठिकाणी १३ नोंव्हेंबरपर्यंत ९०० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. शासनाने जिल्हानिहाय प्रती हेक्टरी मूग, उडीद, उत्पादकतेची यादी जाहीर करून शासकीय हमीभाव योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यात हेक्टरी केवळ १ क्विटंल ८० किलो इतके मूग खरेदी करण्याची अट घातली होती.
्नखाजगी व्यापारपेठच फुलली
शासकीय हमीभाव केंद्र उशिराने सुरू झाले. तसेच हक्काच्या पैशांसाठी तीन-तीन महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने अनेक शेतकºयांनी खाजगी व्यापारपेठेतच माल विक्री करणे पसंत केले.

Web Title: Parbhani: Text to Confirmation Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.