परभणी : माथ्यावरील ६६ गावांची पाण्यासाठी होतेय दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:51 AM2018-12-08T00:51:35+5:302018-12-08T00:51:55+5:30

जिल्ह्यातील परभणी, मानवत व पाथरी या तीन तालुक्यातील माथ्यावरील ६६ गावांना जायकवाडी प्रकल्प किंवा निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नसल्याने अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी दैना होत आहे. या संदर्भातील व्यथा पेडगाव व रुढीच्या ग्रामस्थांनी गुरुवारी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकासमोर मांडली.

Parbhani: There are 66 villages on top of the surface | परभणी : माथ्यावरील ६६ गावांची पाण्यासाठी होतेय दैना

परभणी : माथ्यावरील ६६ गावांची पाण्यासाठी होतेय दैना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यातील परभणी, मानवत व पाथरी या तीन तालुक्यातील माथ्यावरील ६६ गावांना जायकवाडी प्रकल्प किंवा निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नसल्याने अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी दैना होत आहे. या संदर्भातील व्यथा पेडगाव व रुढीच्या ग्रामस्थांनी गुरुवारी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकासमोर मांडली.
जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या चार तालुक्यांतील बहुतांश भागाला जायकवाडी, येलदरी प्रकल्पाचे पाणी मिळते. तर सेलू तालुक्यातील बहुतांश गावे, मानवत तालुक्यातील अनेक गावे व परभणी तालुक्यातील अनेक गावांना निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळतो. जिंतूर तालुक्यातील काही गावांना येलदरी, निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळतो; परंतु, परभणी, मानवत व पाथरी तालुक्यातील काही गावे माथ्यावर असल्याने या गावांना कोणत्याही प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामध्ये पेडगाव, एकरुखा, हसनापूर, गव्हा, पान्हेरा, भोगाव, मांडाखळी, डफवाडी, उमरी, आळंद, मोहपुरी, सोन्ना, पिंपळा, जंगमवाडी, मांडेवडगाव, सोनुळा, खडकवाडी, सावळी, सावरगाव, हत्तलवाडी, देवलगाव आवचार, ताडबोरगाव, कोल्हा, किन्होळा, पारवा, जांब, आर्वी, शहापूर, तुळजापूर, टाकळी कुंभकर्ण, धर्मापुरी, नांदापूर, जलालपूर, रुढी, खरबा, सोनुळा, करंजी, पाळोदी, बोंदरवाडी, उजळंबा, बाभळगाव, आंबेगाव आदी गावांचा त्यामध्ये समावेश आहे. अशी जवळपास ६६ गावे आहेत. ज्यांना कोणत्याही प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. परिणामी येथील ग्रामस्थांना फक्त पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. समाधानकारक पाऊस झाला तर त्यांचे वर्ष कसेबसे कडेला येते. अन्यथा पावसाने दांडी मारल्यास पिण्याच्या पाण्यासाठी येथील ग्रामस्थांची धांदल उडते. अनेक वर्षांपासून या ६६ गावांमध्ये ही परिस्थिती असताना हा प्रश्न सोडविण्यास एकाही राजकीय नेत्याने पुढाकार घेतला नाही. परिणामी प्रशासनातील कोणी वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्री आल्यानंतर येथील ग्रामस्थ आशेने त्यांच्यासमोर हा विषय मांडतात. असाच काहीसा प्रयत्न गुरुवारी जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकासमोर पेडगाव व रुढी येथे करण्यात आला. पेडगाव येथे पथक पाहणी करीत असताना येथील शेतकरी संतोष देशमुख यांनी या गावांची व्यथा पथकासमोर मांडली. या गावांना विशेष बाब म्हणजे उपसा जलसिंचन योजनेतून गोदावरी किंवा दुधना नदीतून पाणी देऊन या गावांची तहान भागवावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या मागणीस उपस्थित शेतकºयांनी प्रतिसाद दिला; परंतु, हे पथक दुष्काळाच्या अनुषंगानेच पाहणी करण्यासाठी आल्याचे या प्रलंबित प्रश्नावर पथकातील अधिकाºयांनी फारसी चर्चा केली नाही. त्यांनी फक्त देशमुख यांच्यासह ग्रामस्थांचे म्हणणे ऐकूण घेतले.
त्यानंतर हाच प्रश्न मानवत तालुक्यातील रुढी येथे दुष्काळाची पाहणी करीत असताना या पथकासमोर येथील शेतकºयांनी उपस्थित केला. विशेष बाब म्हणून जायकवाडी व दुधना प्रकल्पाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या गावांसाठी योजना आखण्याची शिफारस शासनाकडे करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली; परंतु, येथेही पथकाने त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले.
यावर चर्चाच झाली नाही. असे असले तरी येथील ग्रामस्थांनीही आपली अनेक वर्षांपासूनची मागणी पुन्हा एकदा मांडली. त्यामुळे या प्रश्नावर निर्णय होणार नसला तरी दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या मागणीमुळे पथकातील अधिकाºयांना विचार करण्यास भाग पाडले, ही निश्चितच चांगली बाब आहे.
राजकीय नेते मंडळींनी केले दुर्लक्ष
४माथ्यावरील या ६६ गावांच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना गोदावरी, पूर्णा, दुधना, करपरा आदी नद्यांच्या पाण्याचा लाभ मिळतो. जायकवाडी, येलदरी, निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्याचाही बहुतांश वेळा लाभ मिळतो; परंतु, या ६६ गावच्या ग्रामस्थांना मात्र असा कोणताही लाभ मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये निराशाची भावना निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न सोडविण्यासाठी एकाही राजकीय नेत्याने पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना याबाबत सातत्याने खंत वाटते; परंतु, या संदर्भात ६६ गावांमधील ग्रामस्थांचे संघटन झाले नसल्याने त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहचलेला नाही. परिणामी हा प्रश्न प्रलंबित आहे.
गावे उंचावर असल्याचा फटका
ही सर्व ६६ गावे उंंचावर असल्याने या गावांना इतर योजनांचे पाणी आणता येत नाही. त्यासाठी उपसा जलसिंचन योजना हा एकमेव पर्याय असल्याचे पेडगाव येथील शेतकरी संतोष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रशासनाने या संदर्भात गांभीर्याने दखल घेऊन या गावांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. या संदर्भात बोलताना बाळासाहेब जामकर म्हणाले की, या ६६ गावांना अनेक वर्षापासून कोणत्याही योजनेचे पाणी मिळत नाही. त्यामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थांना दिवाळीनंतर नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात तर येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी सातत्याने भटकंती असते. त्यामुळे या ६६ गावांचा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

Web Title: Parbhani: There are 66 villages on top of the surface

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.