परभणी : ‘दुधना’त केवळ ५४ दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:18 PM2019-07-04T23:18:43+5:302019-07-04T23:19:18+5:30

अनेक शहरांसह शेकडो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात केवळ ५४ दलघमी पाणी शिल्लक असून हा प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागत आहे.

Parbhani: There are only 54 Dalgami water in milk | परभणी : ‘दुधना’त केवळ ५४ दलघमी पाणी

परभणी : ‘दुधना’त केवळ ५४ दलघमी पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : अनेक शहरांसह शेकडो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात केवळ ५४ दलघमी पाणी शिल्लक असून हा प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागत आहे.
निम्न दुधना प्रकल्पातून सेलू शहरासह जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा शहराला पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईच्या काळात परभणी, पूर्णा या शहरांनाही प्रकल्पातून पाणी देण्यात आले होते. दुधना नदीपात्रात पाणी सोडल्याने शेकडो गावांची तहान भागली होती. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा जमा झाला नाही. दोन वर्षापूर्वीच्या पाणीसाठ्यावर यंदाच्या उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला होता. जून महिन्यात परभणी आणि पूर्णा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हा प्रकल्प सध्या मृतसाठ्यात गेला आहे. जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाला असून अद्यापपर्यंत मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुधना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात थोडीही वाढ झाली नाही.
या प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून सेलू शहराला पाणीपुरवठा करताना पालिकेच्या कर्मचाºयांना कसरत करावी लागत आहे. प्रकल्पाच्या बॅकवॉटरमधून पिकांसाठी पाणी घेणाºया शेतकºयांना पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. सध्या या धरणात केवळ ५४ दलघमी पाणी असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १३१ मि.मी. पाऊस
च्१ जून ते ३ जुलै या काळात निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये केवळ १३१ मि.मी. पाऊस झाला आहे. या पाणलोट क्षेत्रात सुरुवातीला झालेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात थोडीही वाढ झाली नाही.
च्औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील पावसाचे पाणी या प्रकल्पात अडविले जाते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यासच निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा होणार आहे.

Web Title: Parbhani: There are only 54 Dalgami water in milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.