परभणीत चोरट्यांनी ९ दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:31 AM2019-08-05T00:31:50+5:302019-08-05T00:32:05+5:30
शहरातील कच्छी बाजार परिसरातील ९ दुकाने फोडून चोरट्यांनी ४१ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली आहे़ या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ही घटना शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान घडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील कच्छी बाजार परिसरातील ९ दुकाने फोडून चोरट्यांनी ४१ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली आहे़ या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ही घटना शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान घडली़
परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कच्छी बाजार परिसरातील ९ दुकाने एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली़ यामध्ये कच्छी बाजार परिसरातील फरहान मोहम्मद सिद्दीकी हिंगोरा यांच्या राजा मार्केटींग शुज सेंटर फोडून एका दुकानाच्या गल्लीतील १० हजार रुपयांची रोख लंपास केली़ त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा याच परिसरातील पवन मुंदडा यांच्या श्रवण इलेक्ट्रीकल्स हे दुकान फोडून या दुकानाच्या गल्ल्यातून १० हजार रुपये, रमेश पामे यांचे प्रकाश ट्रेडर्स दुकानाचे शटर वाकवून गल्ल्यातील ७ हजार रुपये लांबविले़ बाबा कांबळे यांच्या बालाजी फुटवेअर दुकानातील ६ हजार रुपये, गौरी शंकर वरकरे यांच्या रुद्राक्ष कन्फेक्शनरी हे दुकान फोडून दुकानाच्या गल्ल्यातील ३ हजार ८०० रुपये लंपास केले़
गौरी मेघराज यांच्या कोठारी ट्रेडर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला़ दुकानाच्या गल्ल्यातील १ हजार रुपये, मो़ एजाज मो़ इलियास यांच्या संजेरी ट्रेडर्स हे दुकान फोडून गल्ल्यातील २ हजार रुपये लंपास केले़ त्यानंतर इद्रिस बोगाणी यांच्या इस्माईल अँड कंपनी या दुकानातील १ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले़ एकंदरीत शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत चोरट्यांनी कच्छी बाजार या मुख्य बाजारपेठेत धुमाकूळ घालत ९ दुकाने फोडली़ या दुकानातील इतर कोणत्याही वस्तुला हात न लावता गल्ल्यातील ४१ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली़ रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली़
त्यानंतर फिर्यादी फरहान मो़ सिद्दीक हिंगोरा यांच्या फिर्यादीवरून शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास अभय दंडगव्हाणे हे करीत आहेत़
घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले हाते़ श्वान जागेवरच घुटमळल्याने चोरट्यांचा सुगावा लागला नाही़
दरम्यान, शनिवारी रात्री शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कच्छी बाजार या एकाच परिसरातील ९ दुकाने फोडल्याने शहरातील व्यापाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़