परभणी:चोरट्याकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 11:59 PM2019-07-24T23:59:08+5:302019-07-24T23:59:39+5:30

जिल्ह्यात घरफोड्या करून नागरिकांना जेरीस आणलेल्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने २३ जुलै रोजी ताब्यात घेलते असून, त्याच्याकडून दोन मोटारसायकल, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा १ लाख १९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

Parbhani: Thieves seize all lakh cases | परभणी:चोरट्याकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

परभणी:चोरट्याकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात घरफोड्या करून नागरिकांना जेरीस आणलेल्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने २३ जुलै रोजी ताब्यात घेलते असून, त्याच्याकडून दोन मोटारसायकल, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा १ लाख १९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या चोरी, घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना एका आरोपीची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला हाती लागली़ गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २३ जुलै रोजी रात्री आरोपी बालाजी विष्णू माने (२८, रा़ संत गाडगे बाबा नगर, परभणी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्याची चौकशी केली असता, कोतवाली पोलीस ठाण्यात २ आणि नवा मोंढा पोलीस ठाण्यात २ गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली़ नवा मोंढा आणि कोतवाली भागात चोरलेल्या दोन मोटारसायकल (क्रमांक एमएच २२ वाय-९९९१ आणि एमएच २२ एल-९६५०) पोलिसांनी जप्त केल्या आहेत़ तसेच उड्डाणपूल ते बसस्थानक या रस्त्यावर स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्सला हिसका मारून ती पर्स पळविली होती़
या पर्समधील सोन्याचे गंठण, सोन्याची पोत, अंगठी असा ३८ हजार ७०० रुपयांच्या वस्तू काढून ही पर्स रामकृष्णनगर भागात फेकून दिल्याचे आरोपीने कबूल केले़ तसेच आॅटोमधून जात असलेल्या एका महिलेच्या हातातील पर्सही हिसकावल्याचे आरोपीने कबूल केले आहे़
दर्गा रोड भागातही याच पद्धतीने गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले़ या प्रकरणात दोन मोटारसायकल, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख १९ हजार ७०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती दिली.

Web Title: Parbhani: Thieves seize all lakh cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.