परभणी : बनावट शिक्के बनविणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:28 AM2018-08-12T00:28:08+5:302018-08-12T00:29:01+5:30
बनावट नियुक्ती आदेश तयार करून बेरोजगारांची फसवणूक करणाºया टोळीतील शिक्के बनविणारा सुधीर शंकर आडसूळ या आरोपीस नवी मुंबईतील उलवे परिसरातून ९ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): बनावट नियुक्ती आदेश तयार करून बेरोजगारांची फसवणूक करणाºया टोळीतील शिक्के बनविणारा सुधीर शंकर आडसूळ या आरोपीस नवी मुंबईतील उलवे परिसरातून ९ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे़
आरोग्य खात्यात नोकरी लावण्याचे आमीष दाखवून तालुक्यातील ढवळकेवाडी येथील दोन सुशिक्षीत बेरोजगारांची १७ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी २३ जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली़ त्यात १ आॅगस्ट रोजी मुंबई येथून आरोपी जितेंद्र भोसले यास अटक केली होती़ तो सध्या पोलीस कोठडीत असून, बनावट शिक्के तयार करून नियुक्ती आदेशावर मारल्या प्रकरणी सुधीर शंकर आडसूळ याला ताब्यात घेतले आहे़ शुक्रवारी त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली़ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवि मुंडे, मोईनोद्दीन पठाण, साहेब मानेबोईनवाड, सुग्रीव केंद्रे, गणेश वाघ, शेख जिलानी, सुधीर लोखंडे, आनंद जोगदंड, विष्णू वाघ हे तपास करीत आहेत़
६५ लाखांना गंडविले
या प्रकरणात आतापर्यंत गंगाखेड तालुक्यातील ढवळकेवाडी येथील दोन युवकांबरोबरच वसमत, ओंढा नागनाथ आणि सेलू तालुक्यातील दहा बेरोजगार युवकांची ६५ लाख ५० हजार रुपयांना फसवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे़ बेरोजगार युवकांना बनावट नियुक्ती आदेश देऊन त्यावर सही करणाºया आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत़ आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींकडून १ लाख रुपये आणि बनावट नियुक्ती आदेश जप्त करण्यात आले आहेत़