परभणी : फरार तिघे पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:07 AM2018-11-14T00:07:41+5:302018-11-14T00:08:04+5:30
जबरी चोरी तसेच वाळू चोरीचे गुन्हे दाखल असताना सुद्धा ८ वर्षापासून न्यायालयात अनुपस्थित राहून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात अखेर गंगाखेड पोलिसांना यश आले असून या तिघांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): जबरी चोरी तसेच वाळू चोरीचे गुन्हे दाखल असताना सुद्धा ८ वर्षापासून न्यायालयात अनुपस्थित राहून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात अखेर गंगाखेड पोलिसांना यश आले असून या तिघांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२००८ व २०१० साली जबर चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपी गजानन प्रभाकर कचरे (रा.जैनगल्ली अंबाजोगाई) हा न्यायालयाने वारंवार समन्स तसेच अटक वॉरंट काढून सुद्धा न्यायालयात हजर राहत नव्हता व पोलिसांनाही मिळून येत नव्हता. याच बरोबर २०१० साली वाळू चोरीसह महाराष्ट्र गौण खनीज अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर विश्वनाथ रघुनाथ दहिफळे व वैजनाथ रघुनाथ दहिफळे (रा.हाळंब ता.परळी) हे दोघे भाऊही न्यायालयात हजर राहत नसल्याने गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोईनोद्दीन पठाण, अन्ना मानेबोईवाड, शेख मुजीब, सुग्रीव कांदे, शेख जिलानी, रवि कटारे आदी पोलीस कर्मचाºयांनी ११ नोव्हेंबर रोजीच्या रात्री सापळा लावून तिघाही आरोपींना ताब्यात घेऊन जेरबंद केले. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात अनुपस्थित राहिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.