परभणी : साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:34 AM2018-06-11T00:34:23+5:302018-06-11T00:34:23+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेला ३ हजार ४३८ विद्यार्थी उपस्थित होते़ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १० जून रोजी कर सहाय्यक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली़ परभणी शहरातील १५ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेला ३ हजार ४३८ विद्यार्थी उपस्थित होते़
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने १० जून रोजी कर सहाय्यक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली़ परभणी शहरातील १५ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली़
या परीक्षेसाठी ४ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते़ प्राप्त झालेल्या अर्जानुसार जिल्हा प्रशासनाने ४ हजार ३४४ विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केली होती़ १० जून रोजी सकाळी ११ ते १२ यावेळेत ही परीक्षा पार पडली़ ३ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, १ हजार विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित राहिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली़
दरम्यान, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही परीक्षा घेतली़ यासाठी प्रशासनातील अधिकाºयांचीही नियुक्ती करण्यात आली होती़
परीक्षा काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्र परिसरातील १०० मीटरच्या अंतरावर कलम १४४ लागू करण्यात आले होते़ त्याचप्रमाणे दूरध्वनी, एसटीडी, भ्रमणध्वनी यंत्रणेसह ध्वनीक्षेपकेही बंद ठेवण्यात आली होती़ परीक्षा काळात विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला़ कुठेही अनुचित प्रकार घडला नाही़ दरम्यान, शहरातील सर्वच्या सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्तही ठेवला होता़