परभणी : घरफोडीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:10 AM2019-11-20T01:10:05+5:302019-11-20T01:10:24+5:30
येथील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि एका चोरी प्रकरणात तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि एका चोरी प्रकरणात तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील चंद्रकांत किशनराव रुद्रवार यांचे ट्रॅक्टरचे हेड चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे ओम कलेक्श्न हे कापड दुकान फोडून चोरीचा गुन्हा या पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. ताडकळस पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी किशन ऊर्फ पप्पू गोविंदराव वईद (२३), निलेश ऊर्फ लल्लू नारायण जाधव (१९) आणि श्रीकृष्ण ऊर्फ शेंडी आश्रोबा बोबडे (सर्व रा.टाकळी बोबडे) यांना अटक केली. तिन्ही आरोपींनी वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
चोरलेले ट्रॅक्टर हेड आणि कापड दुकानातील कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक एस.एन. लहाने, हवालदार भारत तावरे, नाईक बाबासाहेब रोडे, माधव जंगम, धनंजय कनके यांनी केली. आरोपीस अटक करण्यासाठी सायबर सेलचे गणेश कौटकर यांचे सहकार्य लाभले.
आठ मोटारसायकली जप्त
४पोलिसांनी पकडलेल्या या तिन्ही आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यात पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटारसायकल तसेच दैठणा, नवा मोंढा, नानलपेठ, वसमत, हट्टा, औंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून पोलिसांनी आठ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे वसमत येथे एक झेरॉक्स दुकान, हिंगोली येथे मोबाईल शॉपी, दोन पानपट्टी फोडल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे.