परभणी : पूर्णा येथे रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:44 PM2019-04-12T23:44:56+5:302019-04-12T23:45:30+5:30

तांत्रिक दुरुस्तीसाठी पीटलाईनवरुन जाताना रिकाम्या पॅसेंजर रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या पूर्णा रेल्वेस्थानकाच्या यार्डात घडली.

Parbhani: Three coaches of railway track collapsed in Purna | परभणी : पूर्णा येथे रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरले

परभणी : पूर्णा येथे रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): तांत्रिक दुरुस्तीसाठी पीटलाईनवरुन जाताना रिकाम्या पॅसेंजर रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या पूर्णा रेल्वेस्थानकाच्या यार्डात घडली.
पूर्णा- परळी ही पॅसेंजर रेल्वे दररोज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पूर्णा रेल्वेस्थानकावरुन सुटते. या रेल्वेगाडीची स्वच्छता आणि किरकोळ दुरुस्तीचे काम स्थानकावरील यार्डात केले जाते.
गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गाडीची स्वच्छता करुन तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी ही रेल्वे पीट लाईनवरुन जात असताना रुळावरील एका सांध्यावरुन शंटिंग करताना १०२ ब क्रमांकाच्या ईएचएल पॉर्इंटवर ९६४०६, ९९४५५ आणि ०७४२५ या क्रमांकाचे तीन डबे रुळावरुन खाली घसरले. ही गाडी रिकामी असल्याने कोणतीही जीवीत हानी अथवा नुकसान झाले नाही. घटना घडताच दुर्घटना निवारण पथक (एआरटी) घटनास्थळी दाखल झाले. खाली घसरलेले तीनही डबे पूर्ववत रुळावर आणण्यासाठी या पथकाला ५ तास परिश्रम घ्यावे लागले. नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकारीही पूर्णा येथे दाखल झाले असून सायंकाळी ७ वाजता डबे रुळावर घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. या घटनेमुळे मुख्य मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नसला तरी पूर्णा- परळी आणि पूर्णा- आदिलाबाद या दोन रेल्वेगाड्या दोन ते तीन तास विलंबाने धावल्या.

Web Title: Parbhani: Three coaches of railway track collapsed in Purna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.