परभणी : पाथरी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:33 AM2018-11-28T00:33:44+5:302018-11-28T00:34:18+5:30

शेतातील विद्युत रोहित्राजवळ लागवड करण्यात आलेल्या एकाच गटातील तीन शेतकºयांचा ५ एकर ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़

Parbhani: Three farmers of Pathari taluka burnt the sugarcane | परभणी : पाथरी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक

परभणी : पाथरी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : शेतातील विद्युत रोहित्राजवळ लागवड करण्यात आलेल्या एकाच गटातील तीन शेतकºयांचा ५ एकर ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़
पाथरी तालुक्यात मागील काही दिवसांत विद्युत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाल्याच्या सहा ते सात घटना घडल्या आहेत़ ऊस जळाल्यानंतर शेतकºयांना नुकसान भरपाईही मिळत नाही आणि जळालेला ऊस कारखानेही वेळेवर गाळपासाठी नेत नाहीत़ त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत़ २७ नोव्हेंबर रोजी दुपारी तालुक्यातील पाथरगव्हाण बु़ येथील शेतकरी लक्ष्मण रामभाऊ घांडगे, वसंत शंकरराव घांडगे, किशन धोंडीबा घांडगे यांची गट नंबर ३३६ मध्ये शेती आहे़ तिन्ही शेतकºयांची ऊस लागवड जवळजवळ आहे़ या शेतात विद्युत रोहित्र बसविलेल आहे़ या विद्युत रोहित्राच्या जवळ वीज तारेला घर्षण झाल्यानंतर आग लागून पाच एकरवरील ऊस जळून खाक झाला आहे़ ऊस पेटला असताना तो विझविताही आला नाही़ त्यामुळे ऊस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे़

Web Title: Parbhani: Three farmers of Pathari taluka burnt the sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.