परभणी : दोन हायवा ट्रकसह तीन जेसीबी मशीन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:47 AM2018-05-28T00:47:48+5:302018-05-28T00:47:48+5:30
तालुक्यातील गौंडगाव व मैराळ सावंगी येथील वाळू धक्क्यावरून नियमबाह्य वाळू उपसा सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करीत दोन हायवा ट्रक आणि तीन जेसीबी मशीन जप्त केल्या आहेत़ शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : तालुक्यातील गौंडगाव व मैराळ सावंगी येथील वाळू धक्क्यावरून नियमबाह्य वाळू उपसा सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करीत दोन हायवा ट्रक आणि तीन जेसीबी मशीन जप्त केल्या आहेत़ शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़
गौंडगाव, मैराळ सावंगी नदीपात्रातून जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळुचा उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाºयांकडे आल्या होत्या़ या तक्रारीवरून २६ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे यांच्या पथकाने गौंडगाव येथील वाळू धक्क्यावर धाड टाकली़ पथक दाखल होत असल्याचे पाहताच वाळू माफियांनी धक्क्यावरील वाहने पळवून नेण्यास सुरुवात केली़ यावेळी एमएच ४४/९१३१ आणि एमएच २४/एबी ७७६६ हे दोन हायवा ट्रक पाठलाग करून पकडण्यात आले़ याच वेळी वाळू धक्क्यावर असलेल्या तीन पोकलॅन मशीन धक्क्यावरून पळवून नेत गौंडगाव-मैराळ सावंगी रस्त्यापासून दोन किमी आत दिगंबर कºहाळे यांच्या शेतात लपवून ठेवल्या होत्या. जिल्हाधिकाºयांच्या पथकाने या जेसीबी मशीन शोधून ताब्यात घेतल्या आहेत़
तलाठ्यांचा शेतात मुक्काम
जिल्हाधिकाºयांनी कारवाई केल्यानंतर वाळूमाफियांनी जेसीबी मशीन शेतात लपवून ठेवल्या होत्या़ या मशीन शोधून पथकाने जप्त केल्या़ परंतु, मशीन सुरू करण्याचे यंत्रच काढून नेण्यात आले आहे़ त्यामुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत या मशीन सुरू झाल्या नाहीत़
परिणामी गंगाखेड येथील तलाठी चंदक्रांत साळवे, अक्षय नेमाडे, मुलंगे, वाकळे, अव्वल कारकून रामराव जाधव, एरंडवाड, जमादार देवराव मुंडे, रामराव तांदळे यांना शेतात बोलावून मशीन त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या़ परंतु, रात्रभर या मशीन सुरू न झाल्याने तलाठी व महसूलच्या कर्मचाºयांना शेतातच मुक्कामी रहावे लागले़
रविवारी सायंकाळी ६़३० वाजेपर्यंत जप्त केलेल्या मशीन सोनपेठ पोलीस ठाण्यात नेण्याची व्यवस्था झाली नसल्याने कर्मचारी शेतातच बस्तान मांडून आहेत़
माहिती देण्यास वेळ नाही
गौंडगाव येथे गोदावरी नदीपात्रातील वाळू धक्क्यावर कारवाई करण्यासाठी जात असताना जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी अनेक वेळा वाहने बदलली. या संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे यांना फोन केला़ मात्र त्यांनी नंतर माहिती देते, असे सांगून माहिती देण्यास टाळले़ गंगाखेड तहसील कार्यालयातील कर्मचारी, तलाठी यांना वारंवार संपर्क साधूनही ‘माहिती उपलब्ध नाही’, असे उत्तर कर्मचाºयांकडून दिले जात होते़