परभणी : सोनपेठ येथील जबरी चोरी प्रकरणात तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:58 PM2019-06-13T23:58:44+5:302019-06-13T23:59:04+5:30

सोनपेठ तालुक्यातील बुधापीर नदीपात्रात मोटारसायकल अडवून २१ हजार रुपयांची लूट केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींकडून ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ सायबर सेल आणि सोनपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला़

Parbhani: Three people arrested in connection with the robbery case at Sonpeth | परभणी : सोनपेठ येथील जबरी चोरी प्रकरणात तिघांना अटक

परभणी : सोनपेठ येथील जबरी चोरी प्रकरणात तिघांना अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सोनपेठ तालुक्यातील बुधापीर नदीपात्रात मोटारसायकल अडवून २१ हजार रुपयांची लूट केल्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींकडून ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ सायबर सेल आणि सोनपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला़
२१ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नितीन भगवानराव सहजराव (रा़ ममदापूर ता़ परळी) हे बुधापूर नदीपात्रातून मोटारसायकलने जात असताना तिघांनी त्यांना अडवून सोन्याची अंगठी, चांदीचे ब्रासलेट आणि एक मोबाईल असा २१ हजारांचा ऐवज लुटला होता़ या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़ या प्रकरणात सोनपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि उस्मान शेख यांनी एक पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला़ सायबर सेलच्या मदतीने १२ जून रोजी कृष्णा शंकर चव्हाण (रा़ लहुजीनगर सोनपेठ), रामा मिसाळ (रा़ सोनपेठ) व गोविंद मोरे (रा़ सोनपेठ) या तिघांना ताब्यात घेतले़ आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे़ या तीनही आरोपींना १४ जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली़ ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उस्मान शेख, उपनिरीक्षक गंगाप्रसाद दळवी, एम़एम़ भुमकर, गौस पठाण, राम घुले यांनी केली़

Web Title: Parbhani: Three people arrested in connection with the robbery case at Sonpeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.